शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

देशात Omicronचा धोका वाढला! जयपुरात एकाच कुटुंबातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह, चंदीगडमध्ये महिलेनं क्वारंटाईन तोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 9:11 AM

Omicron Variant : महाराष्ट्रात 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका आता भारतातही वाढला आहे. कर्नाटकातील दोन लोकांमध्ये Omicron प्रकाराची पुष्टी झाली आहे. यानंतर राज्य सरकारने करोना विषयक नवे नियम जारी केली आहेत. महाराष्ट्रातही 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. यांचेही नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. (Omicron Variant in India)

जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील ज्या 9 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, त्यांपैकी 4 जण दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत. अद्याप त्यांच्यात ओमिक्रॉनच्या संसर्गाची पुष्टी झालेली नाही. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या सर्वच्या सर्व 9 जणांना राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात (RUHS) आइसोलेट करण्यात आले आहे.

येथील मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. नरोत्तम शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जणांचे नमुने घेण्यात आले असून, त्यांपैकी 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये 4 लोक दक्षिण आफ्रिकेतून परतल्याचे समोर आले आहे. नव्या नियमांप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्यांना आरयूएचएसमध्ये आयसोलेट रहावे लागेल. संक्रमित आढळलेल्या सर्व 9 जणांना आयसोलेट करण्यात आले आहे, तर 5 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

चंदीगडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महिलेने क्वारंटाइन तोडले -चंदीगड केंद्रशासित प्रदेशात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 39 वर्षीय महिलेने होम क्वारंटाईनचे नियम तोडले (Woman breaks quarantine in Chandigarh) आणि ती थेट बुक केलेल्या 5-स्टार हॉटेलमध्ये पोहोचली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तीन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून चंदीगडला परतली होती. तेव्हा त्यांचा अहवालही निगेटिव्ह आला होता. पण मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार होते.

याच बरोबर, आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, 1 डिसेंबरला महिलेला होम क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले होते, मात्र 2 डिसेंबरला ती नियम मोडून 5 स्टार हॉटेलमध्ये गेली. या महिलेवर कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने चाचणी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस