बाहेती महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या छळप्रकरणी तिघांवर गुन्हा तक्रार : बदनामी व भावाला ठार मारण्याची दिली होती धमकी
By admin | Published: February 02, 2016 12:16 AM
जळगाव- ॲड.सिताराम बाहेती महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी प्रियंका आंबेकर, वैशाली लोहार व विशाल सैंदाणे या तीनही विद्यार्थ्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. छळाला कंटाळून त्या विद्यार्थिनीने ३ डिसेंबर २०१५ रोजी महाविद्यालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती सुदैवाने बचावली होती. तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव- ॲड.सिताराम बाहेती महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी प्रियंका आंबेकर, वैशाली लोहार व विशाल सैंदाणे या तीनही विद्यार्थ्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. छळाला कंटाळून त्या विद्यार्थिनीने ३ डिसेंबर २०१५ रोजी महाविद्यालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती सुदैवाने बचावली होती. तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आणला दबाव १. यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, विशाल, प्रियंका व वैशाली यांनी संबंधित विद्यार्थिनीशी शाहूनगरातील एका क्लासेसमध्ये ओळख केली. २. नंतर प्रियंका व वैशाली यांनी विशाल याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर प्रियंका व वैशाली यांनी संबंधित विद्यार्थिनीला विशालशी शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. तसे केले नाही तर बदनामी करू, अशी धमकी दिली.३. नंतर विशालनेही त्या विद्यार्थिनीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली. संबंध ठेवले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकीन, असा दम संबंधित विद्यार्थिनीला भरला. इन्फो-विद्यार्थिनीने केला होता आत्महत्येचा प्रयत्नप्रियंका, वैशाली व विशाल यांच्याकडून होणार्या त्रासाला कंटाळून संबंधित विद्यार्थिनीने बाहेती महाविद्यालयात ३ डिसेंबर २०१५ रोजी तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उडी मारल्याने तिच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने तिला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ३०५, ३५४ (अ) आदी कलमांनुसार वैशाली, प्रियंका व विशाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास निरीक्षक राठोड करीत आहे.