शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

आत्महत्येची धमकी देताना गमावला जीव

By admin | Published: January 14, 2017 1:52 AM

कॉलेज आणि क्लासमध्ये जाऊन उशिरा घरी आल्याबद्दल रागे भरणाऱ्या आई-वडिलांनीसंतापणे थांबवावे, यासाठी धमकीवजा गळफास

बंगळुरू : कॉलेज आणि क्लासमध्ये जाऊन उशिरा घरी आल्याबद्दल रागे भरणाऱ्या आई-वडिलांनीसंतापणे थांबवावे, यासाठी धमकीवजा गळफास लावून घेतलेल्या एका विद्यार्थिनीस खरोखरचच जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री बंगळुरू शहरात घडली.पोलिसांनी सांगितले की, शहराच्या ब्याटरायणपूरा भागात राहणाऱ्या रमेश नावाच्या एका छोट्या व्यापाऱ्याच्या कुटुंबावर हे अरिष्ट आले. कीर्तना ही त्यांची १८ वर्षांची मुलगी म्हैसूर रोडवरील एका खासगी महाविद्यालयात शिकत असे व कॉलेज संपले की क्लासलाही जात असे. बुधवारी रात्री कीर्तनाला कॉलेज व क्लास करून घरी यायला नेहमीपेक्षा उशीर झाला. काळजीने वाट पाहणाऱ्या आई-वडिलांनी ती घरी येताच तिला फैलावर घेतले. कीर्तना हिने उशीर का झाला याचे कारण सांगितले. पण तरीही आई-वडिलांनी भुणभूण सुरूच ठेवली. बराच वेळ पालकांची कुरकुर सुरूच राहिल्याने कीर्तना वैतागली व आता गप्प बसला नाहीत तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत ती बाजूच्या खोलीत गेली. आई-वडिलांवर परिणाम व्हावा यासाठी तिने छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास तयार केला व त्यात मान अडकवली. अर्थात खरा फास लावून घेण्याचा तिचा इरादा नव्हता. पण ती काय करते आहे हे पाहण्यासाठी दरवाजात येऊन उभे राहिलेल्या आई-वडिलांनी दरडावल्यावर ती एकदम दचकली आणि तिच्या पायाखालचे स्टूल सरकून फासाची गाठ घट्ट आवळली गेली. (वृत्तसंस्था)