मास्कची मागणी करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालयाने धमकावले ? प्रियंका गांधींनी शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:28 PM2020-04-04T12:28:10+5:302020-04-04T16:32:06+5:30
मेडीकल स्टाफला देण्यात आलेले मास्क साधारण व्हायरस देखील रोखू शकत नाही, असही डॉक्टरांचे म्हणणे आहे. एम्सच्या डॉक्टरांचे देखील हेच म्हणणे आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेच.
नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बांदा राजकीय मेडीकल काँलेजमध्ये ऑउटसोर्सिंगवर तैनात असलेल्या मेडीकलच्या विद्यार्थीनीचा एक व्हिडिओ शेअऱ केला आहे. ही विद्यार्थीनी कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटमध्ये तैनात आहे. आपण रुग्णालय प्रशासनाकडे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने टर्मिनेट करण्याची आणि हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप मेडीकल कॉलेजमधील विद्यार्थीनीने केला आहे.
व्हिडिओत विद्यार्थ्यांनी आरोप केला की, कोणतीही सूचना न करता मेडीकल स्टाफच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. रुग्णालयात सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा आहे. याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केल्यानंतर येथून निघून जा अन्यथा हात-पाय तोडण्यात येईल, अशी धमकी दिले. तसेच तुम्हाला टर्मिनेट करण्याचा आदेश योगी आदित्यनाथ यांनीच दिल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यीनीचा हा व्हिडिओ शेअऱ करून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
सध्या देशातील मेडीकल स्टाफला सहकार्याची गरज आहे. ते जीवनदाता असून योध्द्याप्रमाणे लढत आहेत. बांदा येथे नर्स आणि मेडीकल स्टाफला त्यांच्या सुरक्षेसाठीची उपकरणे न देणे आणि त्यांच्या पगारीत कपात करणे अन्यायकारक असल्याचे सांगत प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारने मेडीकल स्टाफचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले.
इस समय हमारे मेडिकल स्टाफ को सबसे ज्यादा सहयोग करने की जरूरत है। वे जीवनदाता हैं और योद्धा की तरह मैदान में हैं। बांदा में नर्सों और मेडिकल स्टाफ को उनकी निजी सुरक्षा के उपकरण न देकर और उनके वेतन काट करके बहुत बड़ा अन्याय किया जा रहा है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 4, 2020
यूपी सरकार से मैं अपील करती हूँ कि..1/2 pic.twitter.com/hjpR78sacT
मेडीकल स्टाफला देण्यात आलेले मास्क साधारण व्हायरस देखील रोखू शकत नाही, असही डॉक्टरांचे म्हणणे आहे. एम्सच्या डॉक्टरांचे देखील हेच म्हणणे आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेच.