शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पवारांच्या ‘नितीशकुमार मिसाईल’मुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2016 3:44 AM

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘नंबर वन’ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला प्रस्ताव बहुतांश विरोधी पक्षांनी फेटाळला आहे.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली-भाजपेतर पक्षांची आघाडी उभारायची झाल्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘नंबर वन’ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला प्रस्ताव बहुतांश विरोधी पक्षांनी फेटाळला आहे.नितीशकुमार हे सेतूसारखी शक्ती म्हणून काम करणार असेल तर त्यांच्या नेतृत्वात भाजपेतर पक्षांची आघाडी उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खुलेपणाने विचार करेल, अशा आशयाचे विधान पवारांनी केल्यामुळे राजकीय वादळ उभे ठाकले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि अन्य प्रमुख पक्षांनी असे समीकरण मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रालोआविरुद्ध लढाईचे नेतृत्व राहुल गांधी करणार असून तेच सर्वाधिक सक्षम नेते आहेत, असे काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात कोणतीही आघाडी स्थापन करण्याची कल्पना फेटाळून लावतानाच बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अशा आघाडीचा भाग बनणार नसल्याचे नमूद केले. देशात भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी मुलायमसिंग यादव हेच एकमेव सक्षम नेते आहेत, असे समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी म्हटले. ममता बॅनर्जी नितीशकुमार यांना समर्थन देणार असतील तर ते आश्चर्यच ठरेल, असा टोलाही त्यांनी हाणला. (वृत्तसंस्था)>दिल्ली दूर; पाटणाच बरा - राजदचा सल्लाबिहार सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी राजदने नितीशकुमार यांच्याकडे सोपविली असली तरी त्यांनी बिहारचे व्यापक हित लक्षात घेत दिल्लीकडे नव्हे पाटण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला राजदच्या नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी याआधीच आपला मनसुबा स्पष्ट केला आहे.>सोनिया गांधींचीही प्रशंसा...पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. सोनिया गांधी सर्वांना सामावून घेणाऱ्या आणि एकत्र ठेवणाऱ्या नेत्या असून विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल अधिक अनुकूलता आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय पातळीवर पकड मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे नेतृत्व समोर येत आहे; मात्र निर्णय देणे खूप घाईचे ठरेल. येत्या तीन वर्षांत राहुल कशी कामगिरी करतात यावर ते निर्भर असेल. बहुतांश राज्यांना स्वत: भेटी देणारे ते एकमेव नेते आहेत, अशी पुस्तीही पवारांनी जोडली होती.पवारांची सारवासारव....पवारांनी नितीशकुमार यांच्याकडे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व सोपविण्याची भाषा केल्यानंतर विविध घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर पवारांनी मी राहुल गांधी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. केवळ नितीशकुमार हे सक्षम आहेत, असे विधान केले होते, असे सांगत शुक्रवारी सारवासारव केली. नितीशकुमार यांच्यात भाजपेतर आघाडी उभारण्याची क्षमता असून ते सर्व पक्षांची मोट बांधणारा सेतू ठरतील, या पवारांच्या विधानाचे समर्थन करताना नितीशकुमार यांच्या संजदचे नेते के.सी. त्यागी यांनीही सावध भूमिका घेतली. नितीशकुमार यांच्याकडे क्षमता आहे, एवढेच ते म्हणाले. निवडणुकीत व्यग्र असलेल्या अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमूल काँग्रेस यासारख्या प्रादेशिक पक्षांनी पवारांच्या विधानावर भाष्य केलेले नाही.