नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या सतत मिळत आहेत. ३ दिवसांत अशा १३ विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या आहेत. बुधवारीही धमकीमुळे इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानाला उड्डाणानंतर तातडीने पुन्हा परत बोलवावे लागले तर आकासा एअरलाइन्सचे दिल्ली-बेंगळुरू विमान अहमदाबादला वळवण्यात आले. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१५ ऑक्टोबर रोजी ७ विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या आल्या होत्या. दिल्ली ते शिकागो या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचाही या उड्डाणांमध्ये समावेश होता. या विमानाला तातडीने कॅनडाकडे वळवून इकालुईट विमानतळावर उतरवण्यात आले होते. तपासात बॉम्बच्या धमक्या खोट्या असल्याचे समोर आले.
आरोपींवर कठोर कारवाईबुधवारी, विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना धमकीचे संदेश पाठविण्याबाबत संसदीय समितीला उत्तर दिले. आरोपींची ओळख पटली असून कारवाई सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. तसेच अधिक माहिती गोळा करून अशा अनेक प्रकरणांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.
एअर मार्शल दुप्पटयाप्रकरणी विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सततच्या धमक्यांमुळे, केंद्राने बुधवारी उड्डाणांवर एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. ते विमानात साध्या कपड्यातच राहतील.
कुणाला धमक्या?- आकासा एअरलाइन्सचे दिल्ली बेंगळुरू विमान- इंडिगोचे मुंबई दिल्ली विमान- जयपूर बेंगळुरू एअर इंडिया विमान- दरभंगा मुंबई स्पाईसजेट विमान- सिलीगुडी बेंगळुरू आकासा एअर- दिल्ली शिकागो एअर इंडिया- दम्मम लखनौ इंडिगो विमान- मदुरई सिंगापूर एअर इंडिया विमान- अमृतसर दिल्ली अलायन्स एअर - अयोध्या बेंगळुरू एअर इंडिया एक्सप्रेस- बागडोगरा बेंगळुरू आकासा एअर- मुंबई न्यूयॉर्क एअर इंडिया विमान- मस्कतला जाणारे इंडिगो विमान