नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणातील तीन दोषींनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाने ८ जानेवारी रोजी ११ दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. आत्मसमर्पणाची वेळ वाढवण्याची मागणी बाब न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना व संजय करोल यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी नमूद केली.
'खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल'तीन याचिकाकर्त्यांकडून आत्मसमर्पण करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी रजिस्ट्रीला सरन्यायाधीशांकडून आदेश मागावे लागतील, असे खंडपीठाने यावेळी सांगितले.