गिरणा धरणातून तीन आर्वतन सोडा आमदारांची मुंबईच्या बैठकीत जोरदार मागणी : नाशिकने केले अतिरिक्त पाणी आरक्षण
By admin | Published: December 01, 2015 11:35 PM
जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.
जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.गिरणा धरणांवर अवलंबून असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यातील गावांमधील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधील २५ टक्के पाणी गिरणा धरणात सोडण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर २० ऑगस्ट रोजी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या याचिकेवर यापूर्वी दोन सुनावणी झाल्या आहेत. मंगळवार १ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होती. माथा ते पायथा हा विचार करा - गुलाबराव पाटीलसमान न्याय वाटप तत्वानुसार गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. आवर्तन सोडताना माथा ते पायथा हे तत्व गृहित धरल्यास आम्ही पायथ्याजवळ आहोत. त्यामुळे आवर्तन सोडल्यानंतर पाणी पायथ्यापर्यंत सोडून न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.प्रांतिक वाद करायचा नाही : आमदार उन्मेष पाटीलगिरणा धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यावर मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, पाचोरा या नगरपालिकांसोबत काही गावांमधील नागरिक अवलंबून आहेत. आम्ही शेतीसाठी नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत. पाणी मागणीच्या संदर्भात आम्हाला कोणताही प्रांतिक वाद करायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पाणी न सोडल्यास भीषण टंचाई : आमदार किशोर पाटीलनाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून पाणी न सोडल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याचे सांगितले. सध्या एक आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा धरणातील सद्यस्थितीला असलेला जलसाठा लक्षात घेता मार्च महिन्यापर्यंत दुसरे आवर्तन सोडता येईल. मात्र मार्च महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यास जून महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे त्यांनी सांगितले.