आनंदीबाई बालक मंदिर बसविणार तीन सीसीटीव्ही कॅमेरे अपहरणानंतर दखल : संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
By admin | Published: March 11, 2016 10:23 PM
जळगाव- आनंदीबाई देशमुख बालक मंदीर व विद्या विकास मंदिर संस्था आपल्या मुख्य प्रवेशद्वारांना तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने देशमुख बाल मंदीरात झालेल्या विद्यार्थ्याच्या अपहरणाच्या प्रयत्नानंतर बैठक घेतली. त्यात हा निर्णय झाला.
जळगाव- आनंदीबाई देशमुख बालक मंदीर व विद्या विकास मंदिर संस्था आपल्या मुख्य प्रवेशद्वारांना तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने देशमुख बाल मंदीरात झालेल्या विद्यार्थ्याच्या अपहरणाच्या प्रयत्नानंतर बैठक घेतली. त्यात हा निर्णय झाला. बैठकीत संस्थेच्या योगीनी बाकरे, संध्या गाडगीळ, अंजली गाडगीळ, वंदना ओक, ऋता मेलक, मुख्याध्यापिका शुचिता तारे, अशोक मदाने आदी उपस्थित होते. देशमुख विद्या मंदिराच्या उत्तर व पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला सीसीटीव्ही कॅमेरा असेल. तसेच श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाकडील बाजूलाही सीसीटीव्ही कॅमेरा बसविला जाईल, अशी माहिती अशोक मदाने यांनी दिली. संस्थेने देशमुख विद्या मंदिरात एक सुरक्षा रक्षक नियुक्त केला होता. आता दोन सुरक्षा रक्षक असतील, असा निर्णयही झाला.