बंगळुरू : कर्नाटकचे जनता दल (एस) व काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाचे जोरात प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये काही भाजप नेत्यांबरोबर तळ ठोकून आहेत असा आरोप कर्नाटकच्या जलस्रोत खात्याचे मंत्री व काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.
ते म्हणाले की, कर्नाटकात आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी घोडेबाजार सुरू आहे. राज्यातील काँग्रेसच्या तीन आमदारांना मुंबईमध्ये किती पैशांचे आमिष दाखविण्यात आले याची आम्हाला इत्यंभूत माहिती आहे. मात्र या आमदारांची नावे शिवकुमार यांनी जाहीर केली नाहीत.
कर्नाटकमध्ये काँग्रेस संकटांच्या भोवऱ्यातून शिवकुमार यांनी अनेकदा यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपासंदर्भात काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपा करत असलेल्या हालचालींची सारी माहिती असूनही मुख्यमंत्री या विषयावर तोंड उघडण्यास तयार नाहीत.
सर्व आमदारांनी भाजपाच्या कारस्थानाबद्दल कुमारस्वामी यांना माहिती दिली आहे. सिद्धरामय्या व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू यांनाही साºया घडामोडींची कल्पना आहे. या घडामोडींबाबत कुमारस्वामी यांनी थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका घेतली आहे. मी मुख्यमंत्रीपदी असतो तर भाजपाच्या सारी कृत्ये चव्हाट्यावर आणली असती.