हैदराबाद : निवृत्तीला तीन दिवस शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली असून, एक लाख पगार असलेल्या या अधिका-याला त्यांनी ताब्यात घेतले आहे.विशाखापट्टणम पालिकेत गोल्ला वेंकटा रघुरामी रेड्डी या अधिकाºयाच्या घरी आणि त्याच्या विविध कार्यालयांवर भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पथकाने धाडी घातल्या. त्यांच्या हाती डोळे विस्फारणारी मालमत्ता हाती लागली. त्याच्या विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुपती येथे मालमत्ता असून, शिर्डीतही त्याचे हॉटेल आहे. तेथून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. एकूण १५ ठिकाणीही धाडी टाकल्या असून, संपत्तीचे मोजपाम अद्याप सुरू आहे.संपत्तीची सोमवारी मध्यरात्रीपासून ते मंगळवारपर्यंत मोजणी सुरू होती. त्याने बँक लॉकरमध्ये किती दागिने-जडजवाहिरे ठेवली याची माहिती मिळू शकलेली नाही. एसीबीच्या अधिकाºयांनी रेड्डीचा भाऊ आणि विजयवाडाच्या शहर नियोजन खात्यातील अधिकारी वेंकट शिवप्रसादच्या घरीही धाड टाकली. रेड्डीच्या ‘बेनामी’ प्रॉपर्टीसाठी मालक म्हणून त्याचे नाव होते.बुधवारी गोल्ला रेड्डी निवृत्तहोणार होता. निवृत्तीनिमित्त तो परदेशात शाही पार्टीचेही आयोजन करणार होता. त्यासाठी आपल्या आप्तांच्या विमान प्रवासाचे तिकिटांचे बुकिंग करून ठेवले होते.किती संपत्ती ?- सोने, चांदी, हिºयांचे १० किलो वजनाचे दागिने- सोन्याचे ४ कोटी रुपयांचे दागिने, ५ लाखांचे चांदीचे दागिने, ४३ लाख रोख- चांदीचे दागिनेआणि वस्तू : २५ किलो- मालमत्ता : विजयवाडा-जवळ ९३,०१५ स्क्वेअर फूट जागा, तसेच वेलपूर येथे दोन एकर जमीन- गोल्लाची संपत्ती त्याचा नातेवाईक शिवप्रसाद व त्याची पत्नी गायत्रीच्या नावेही होती- जागेवर आंब्याची बाग- विजयवाडामध्ये तीन मजली व दोन मजली घरे- गुंटूर येथे ५.५ एकर जमीन- चार कंपन्या : साई साधना इन्फ्रा प्रोजेक्ट्स, साई श्रद्धा अव्हेन्यूज, माता इंटरप्रायजेस, नल्लूरिवारी चॅरिटेबल ट्रस्ट
निवृत्तीच्या ३ दिवस आधी ५०० कोटींची संपत्ती उघड, आंध्रचा अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:49 AM