ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 9 - काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पोटनिवडणुकीच्या दरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. बडगाममध्ये झालेल्या गोळीबारात ही घटना घडली आहे. एएनआयच्या मते, काश्मीरच्या बडगाममध्ये मतदान केंद्रांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले आहेत. बडगाममधल्या नसरुल्लापोर येथेही आंदोलक आणि सुरक्षा दल आमने-सामने आले आहेत. काश्मीरमधील हिंसाचारात 4 जण जखमी झाले असून, परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पोटनिवडणुकीच्या मतदानात कोणतंही व्यत्यय येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. निवडणूक आयोगानं श्रीनगरमधल्या तीन जिल्ह्यांतील इंटरनेट सेवाही खंडित केली आहे. पाकिस्तानमधील काही जण या पोटनिवडणुकीसंदर्भात चुकीचे वृत्त देत असल्याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली आहे. गांदेरबल, श्रीनगर आणि बडगाममध्ये सद्यस्थितीत इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेशमध्येही पोटनिवडणुकीदरम्यान हिंसेचं वृत्त समजलं आहे. काँग्रेसचे उमेदवार हेमंत कटारे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून, दोघांना मारहाण करण्यात आली आहे. काँग्रेसनं भाजपा कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.
Budgam Protesters-Security forces clash: Death toll rises to three #JammuKashmir— ANI (@ANI_news) April 9, 2017