शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तीन तलाकची प्रथा अयोग्य! उपराष्ट्रपतींच्या पत्नींनी केला विरोध

By admin | Published: April 08, 2017 9:24 PM

उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांची पत्नी सलमा यांनीही तीन तलाकच्या प्रथेला विरोध केला आहे. कुराणामध्ये तीन तलाकबाबत

ऑनलाइन लोकमत
अलिगड, दि. 8 -  मुस्लिम धर्माच्या अनुयायांमधील तीन तलाकच्या प्रथेविरोधात गेल्या काही काळापासून वातावरणनिर्मिती होत आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांची पत्नी सलमा यांनीही तीन तलाकच्या प्रथेला विरोध केला आहे. कुराणामध्ये तीन तलाकबाबत काहीही उल्लेख नाही. केवळ तलाक तलाक तलाक म्हटल्याने तलाक होत नाही, सलमा यांनी म्हटले आहे. 
चाचा नेहरू मदरसा येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सलमा अंसारी यांनी तीन तलाकबाबत प्रसारमाध्यमांसमोर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी महिलांना कुराण वाचून त्यातील अर्थ समजून घेण्यास सांगितले. ज्यामुळे मौलाना त्यांना चुकीचा अर्थ सांगून  फसवू शकणार नाहीत.   त्या म्हणाल्या, "कुराण वाचले असेल तर याबाबतचे उत्तर नक्कीच मिळेल. कुराणामध्ये तीन तलाकबाबत काहीही उल्लेख नाही. ज्यांनी कुराण वाचले नाही, त्यांना याबाबत काहीच माहीत नाही. तसेच तुम्ही अरबी भाषेतील कुराण वाचले आहे की त्याचे भाषांतर वाचले आहे, याचाही विचार करावा लागेल. बरेच जण मौलाना, मुल्ला यांनी सांगितलेलाच अर्थ प्रमाण मानतात."
दरम्यान सलमा पुढे म्हणाल्या, "कुराण रस्ता दाखवणारा सर्वात मोठा मार्गदर्शक आहे. जर तुम्ही कुराण वाचले नाही तर तुम्हाला कुणीही फसवू शकेल. त्यामुळे महिलांनी कुराण वाचले पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे, असे माला वाटते." गेल्या काही दिवसांपासून तीन तलाकचा मुद्दा चर्चेत आहे. डिसेंबर 2016 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने  तीन तलाकची पद्धत क्रूर असल्याचे सांगत मुस्लिम महिलांना दिलासा देण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉमध्ये काही सुधारणा करण्याबाबत विचारणा केली होती. तसेच तीन तलाक,  बहुविवाह आणि हलाला याबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत.