जळगाव: विमानतळ व वाघुरच्या दाखल गुन्ात रविवारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी माजी नगरसेवक अशोक परदेशी, चंद्रकांत कापसे, डी.डी.वाणी व मुख्य लेखापाल सु.रा.वाणी या चौघांची चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आले. दोन दिवसापुर्वी जिल्हा बॅँकेशी निगडीत माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व बॅँकेचे माजी चेअरमन चिमणराव पाटील यांची चौकशी करण्यात आली होती. नगरपालिकेशी निगडीत गुन्ात चौघे जण रविवारी दुपारी ठाकुर यांच्या कार्यालयात आले होते.
तीन माजी नगरसेवकांची चौकशी
By admin | Published: October 11, 2015 9:11 PM