शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

लोकपालाच्या शर्यतीत सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायाधीश

By admin | Published: January 15, 2016 2:08 AM

सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे एक माजी मुख्य न्यायाधीश, यूजीसीचे एक माजी सदस्य आणि माहिती आयुक्तासह १६ जणांनी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे एक माजी मुख्य न्यायाधीश, यूजीसीचे एक माजी सदस्य आणि माहिती आयुक्तासह १६ जणांनी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केले आहेत.सुभाष अग्रवाल यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जावर माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांच्या आदेशानंतर कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) अर्जदारांची यादी जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्या. ज्ञान सुधा मिश्रा, न्या. सी.के. प्रसाद आणि न्या. बलवीरसिंग चौहान यांना या पदासाठी नामनिर्देशित केले होते. हे तिघेही आता सेवानिवृत्त झाले आहेत. झारखंड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. एम.करपागा विनागम, युजीसीचे माजी सदस्य आणि माजी माहिती आयुक्त एम.एम.अन्सारी आणि माहिती आयुक्त श्रीधर आर्चायुलु यांनी लोकपालपदासाठी थेट अर्ज केले आहे. याशिवाय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही अर्जदारात समावेश आहे. निवड प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल-भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईसाठी स्थापित लोकपालमधील विविध पदांसाठी आलेल्या अर्जदारांची नावे जाहीर केल्याने निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढेल,असे मत माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी यासंदर्भात निर्देश देताना व्यक्त केले होते. -एवढ्या संवेदनशील पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची नावे सार्वजनिक होतील तेव्हाच लोक निवड समितीसमक्ष अनेक तथ्यांचा खुलासा करू शकतील,असेही त्यांचे म्हणणे होते.-डीओपीटीने १७ जानेवारी २०१४ रोजी लोकपालच्या अध्यक्षाचे एक पद आणि अन्य आठ पदांसाठी अर्ज मागितले होते.