पंतप्रधान कार्यालयात तीन IAS अधिका-यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती(ACC)ने तिघांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. यात उत्तराखंडच्या टिहरीचे डीएम मंगेश घिल्डियाल देखील आहेत. त्यांना पीएमओमध्ये अव्वर सचिव पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाने उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना 12 सप्टेंबरला एक पत्र पाठविले. त्याशिवाय मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रन यांना पीएमओमध्ये संचालक आणि आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आम्रपाली काटा यांना उपसचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली.PMOमध्ये टिहरीचे डीएम कर्तव्यावरघिल्डियाल हे यापूर्वी रुद्रप्रयाग जिल्ह्याचे डीएम होते आणि ते केदारनाथच्या पुनर्बांधणी आणि चार धाम रोडच्या बांधकामाशी संबंधित काम पाहत होते. हे दोन्ही प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले. रुद्रप्रयागमध्ये जाण्यापूर्वी घिल्डियाल हे बागेश्वरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करत होते.मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रनत्याचप्रमाणे मध्य प्रदेश केडरच्या 2004 बॅचचे रघुराज राजेंद्रन यांची पीएमओमध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायूचे खासगी सचिव आणि पोलाद कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली स्टील मंत्रालयात काम केले आहे.आंध्र प्रदेश केडर अधिकारी आम्रपाली काटाआम्रपाली काटा आंध्र प्रदेश केडरच्या 2010च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पीएमओमध्ये त्यांची उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्या कॅबिनेट सचिवालयात उपसचिव होत्या. एसीसीचे अध्यक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर गृहमंत्री अमित शहा हे सदस्य आहेत.
PMOमध्ये तीन IAS अधिका-यांवर मोठी जबाबदारी; जाणून घ्या, मोदींसाठी का आहेत विशेष?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 10:22 AM