- ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 7 - कुपवारा जिल्ह्यात पहाटे जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहे. एका जवान गंभीर जखमी झाला असून त्याला विमानाने श्रीनगरमधील लष्कर रुग्णालयात नेऊन भर्ती करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.
हंडवारा शहरात जवानांचा ताफा पोहोचला असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं मात्र दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी संपुर्ण परिसरात नाकेबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. काश्मीर खो-यात लष्कराच्या जवानांवर झालेल्या हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या महिन्यात श्रीनगर - बारामुल्ला हायवेवर लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ज्यामध्ये दोन जवान आणि एक पोलीस शहीद झाले होते, तर पाच जवान जखमी झाले होते.
Terrorist attack on Army convoy Kralgund, in Handwara (Kupwara, J&K); three jawans injured (deferred visuals) pic.twitter.com/ZBfFkPJ287— ANI (@ANI_news) September 7, 2016