नवी दिल्ली - काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानिमित्त देशवासियांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. मात्र या हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिवशी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी कर्नाटकमधील हुबळी येथे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीन काश्मिरी तरुणांची धुलाई केली. हे विद्यार्थी केएलई इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत आहेत. त्यांची नावे आमीर, बासित आणि तालिब आहेत. ते कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असून, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ते आपली नावे सांगत आहेत. तसेच त्यांच्या बॅकग्राऊंडला ''खाई है ये कसम, सुन ले दुश्मन सभी, है ये दिल की सदा.. पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद'' हे गीत वाजत आहे. त्यादरम्यान, एक छात्रसुद्धा आझादीच्या घोषणा देत असल्याचे ऐकू येत आहे.
पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 7:54 PM