शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

तीन खानांनी रजत शर्मांना उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात

By admin | Published: December 05, 2014 1:56 AM

‘आप की अदालत विथ रजत शर्मा’ या टीव्ही शो ने दूरचित्रवाणीच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेला शो म्हणून इतिहास घडविला.

नवी दिल्ली : ‘आप की अदालत विथ रजत शर्मा’ या टीव्ही शो ने दूरचित्रवाणीच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेला शो म्हणून इतिहास घडविला. २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकारणी, क्रीडा, व्यावसायिक, आध्यात्मिक गुरूंनी एकत्र येत या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची प्रचिती दिली.प्रगती मैदानावर हजेरी लावणाऱ्या मान्यवरांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, स्मृती इराणी, वेंकय्या नायडू, सुरेश प्रभू, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रामविलास पासवान, धर्मेंद्र प्रधान, राज्यवर्धन राठोड, नजमा हेपतुल्ला, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पी.ए. संगमा, मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे शिंदे, हरीश रावत आदींचा निमंत्रितांमध्ये समावेश होता. शाहरुख, सलमान आणि आमीर खान यांच्यासह अनिल कपूर, अजय देवगण, हेमामालिनी, अनुपम खेर, सोनाक्षी, शत्रुघ्न सिन्हा, राणी मुखर्जी, क्रिकेटपटू गौतम गंभीर, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश, मौलाना मदानी यांचाही उपस्थितांमध्ये समावेश होता.अनिल अंबानी, गौतम अदानी, हरी भरतिया, राजकुमार धूत हे उद्योगपतीही कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली, हिमेश रेशमिया, उदित नारायण, अनू मलिक, जाहिरात गुरू व गीतकार प्रसून जोशी, राखी सावंत, डॉ. नरेश त्रेहान, दलेर मेहंदी, साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, राजू श्रीवास्तव, साक्षी सिन्हा आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, सचिन पायलट, जनार्दन द्विवेदी, सलमान खुर्शीद, जगदीश टायटलर, विजय बहुगुणा, रिता बहुगुणा, रेणुका चौधरी, सुशीलकुमार शिंदे, आर.के. धवन, डॉ. करणसिंग, संजदचे अध्यक्ष शरद यादव, रालोदचे अध्यक्ष अजितसिंग, अमरसिंग, जया बच्चन यांनीही हजेरी लावली होती.या शो च्या खास हायलाईटस्मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आप की अदालत’ मधील हजेरीच्या खास आठवणी आणि अनुभवांचा समावेश होता. तीन खानांनी रजत शर्मा यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत प्रश्न विचारून भंडावून सोडल्याचा प्रसंगही लक्षवेधी ठरला.आप की अदालत हा कार्यक्रम वेगळा का आहे? याचे कारण देताना मोदी म्हणाले, या कार्यक्रमाच्या २१ वर्षांच्या इतिहासात कुणाल्याही उत्तरासाठी बळजबरी करण्यात आली नाही. आपल्या गोड खुबीने उत्तर मिळविण्याची कला रजत यांना ज्ञात आहे. रजत फार कमी बोलतात पण अगदी क्षुल्लक बाबीतही ते आपले मन झोकतात. त्यामागे त्यांचे हुशार डोके आहे. इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि एडिटर- इन- चीफ असलेले रजत शर्मा म्हणाले की, मी अगदी भारावून गेलो असून माझे शब्द अपुरे पडतात. गेली दोन दशके मी केवळ माझे काम चोख करण्यावरच भर देत होतो. मी कधीही एवढे प्रेम आणि आदराची अपेक्षा केली नाही. देशभरातील आयकॉन्सनी मला भरभरून प्रेम दिले. सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो. मी माझा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला भरघोस समर्थन दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)