डेहराडून/रुद्रप्रयाग : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडजवळ साखरझोपेत असतानाच भूस्खलन झाल्याने ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात ३ जणांचा मृत्यू तर अन्य १६ जण बेपत्ता आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसात केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंडजवळ असलेल्या दात पुलिया येथे भूस्खलनामुळे तीन दुकाने वाहून गेली. या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे, असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले.
दुर्घटनेची माहिती मिळताच रात्रीच बचावकार्य सुरू करण्यात आले आणि घटनास्थळापासून ५० मीटर खाली वाहणाऱ्या मंदाकिनी नदीतून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ, राज्य आपत्ती निवारण दल, पोलिस आणि इतर संस्था नदीत आणि आसपासच्या परिसरात बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत, असे ते म्हणाले.
या राज्यांत मुसळधार - उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आसाम, मेघालय, पूर्व राजस्थान, हरयाणा, चंडीगड, अरुणाचल प्रदेश.येथे शक्यता नाही पश्चिम राजस्थान, सिक्कीम, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र.अतिवृष्टी कुठे होईल?मध्य प्रदेशातील नर्मदापुरम, बैतुल, नरसिंहपूर, छिंदवाडा, सिवनी आणि मंडला येथे अतिवृष्टीचा इशारा आहे.