जम्मू : जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्याच्या मरमात गावापाशी मंगळवारी प्रवासी वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात १६ प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये पाच महिला व तीन बालकांचा समावेश आहे. अपघातग्रस्त वाहनातील एका जखमी प्रवाशावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात बारा जण घटनास्थळीच मरण पावले, तर जखमींपैकी चार जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एका धोकादायक वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटून प्रवासी वाहन रस्त्यावरून घसरून ७०० मीटर खोल दरीत कोसळले.>अल्पवयीन मुलाचा मृत्यूआणखी एका स्वतंत्र घटनेत जम्मू शहरानजीक मिरान साहिब भागात भरधाव ट्रकने उडविल्याने एक अल्पवयीन मुलगा ठार झाला. सुशीलकुमार असे त्याचे नाव असून, तो सातवी इयत्तेत शिकत होता. घराबाहेर रस्ता ओलांडताना त्याला हा जीवघेणा अपघात झाला. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.
काश्मीरमध्ये वाहन दरीत कोसळून १६ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:11 AM