शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण : वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाडीशेवाळेचा तरुण तर विहिरीत पडून असोदा ग्रा.प.चा.कर्मचारी

By admin | Published: January 02, 2016 8:33 AM

जळगाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्‘ात झालेल्या तीन अपघातात दोनजण ठार झाले. असोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना विहिरीत पडून यशवंत दगडू ढाके (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ढाके हे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी होते. तर दुसर्‍या घटनेत वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सलीम सरदार तडवी (मुळ रा.बांबरुड राणीचे ह.मु.वाडीशेवाळे ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र युनूस तडवी (वय १८, रा.वाडीशेवाळे) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वाडीशेवाळे-खडकदेवळा रस्त्यावर झाला. मनोज नारायण तासकर (वय ३९, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) या दुचाकीस्वाराला महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने तो गंभीर जखमी

जळगाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्‘ात झालेल्या तीन अपघातात दोनजण ठार झाले. असोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना विहिरीत पडून यशवंत दगडू ढाके (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ढाके हे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी होते. तर दुसर्‍या घटनेत वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सलीम सरदार तडवी (मुळ रा.बांबरुड राणीचे ह.मु.वाडीशेवाळे ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र युनूस तडवी (वय १८, रा.वाडीशेवाळे) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वाडीशेवाळे-खडकदेवळा रस्त्यावर झाला. मनोज नारायण तासकर (वय ३९, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) या दुचाकीस्वाराला महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
वाहतुक पोलिसांमुळे वाचले प्राण
जळगाव येथील मनोज नारायण तासकर हे शुक्रवारी कामानिमित्त नशिराबादला गेले होते. तेथून परत येत असताना दुपारी साडे बारा वाजता महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकीपासून काही अंतरावर समोरुन येणार्‍या ट्रकने कट मारल्याने ते दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ सी.सी.६३२३) घसरुन कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. हा अपघात झाला तेव्हा अनेकजण रस्त्यावरुन वापरत होते, मात्र कोणीही थांबायला तयार नव्हते. तासकर हे जखमी अवस्थेत विव्हळत असताना रस्त्यावरुन जाणार्‍या एका दुचाकीस्वाराने पुढे गेल्यावर पेट्रोलिंगला असलेल्या वाहतूक पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यावेळे हेडकॉन्स्टेबल रवींद्र मोरे,अजित तडवी व ट्रॅफिक वार्डन दीपक भालेराव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मोरे व तडवी यांनी त्यांना एका खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले तर भालेराव यांनी त्यांची दुचाकी आणली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तासकर यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या पत्नीला अपघाताची माहिती दिली.उपचार सुरू झाल्यावर व त्यांची पत्नी आल्यावर पोलीस तेथून रवाना झाले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच दाखल केल्याने तासकर यांचे प्राण वाचले.