तामिळनाडूतील अरक्कोणम येथे रविवारी रात्री मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. क्रेन कोसळल्याने चार जणांचा झाला. तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या शेजारी किलीवेदी भागात मंडियाम्मन मंदिर मायलर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात क्रेन अचानक पडल्याचे दिसत आहे.
द हिंदूच्या वृत्तानुसार, रात्री 8.15 च्या सुमारास ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेमिली येथील मंडियाम्मन मंदिरात एका उत्सवासाठी परिसरातील शेकडो लोक जमले होते. एका कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना झाली, जिथे लोकांनी क्रेनने मंदिरातील मूर्तींना हार घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भयानक घटना घडली. क्रेन चालकाला अटक करण्यात आली आहे.
इंडिया पोस्टमधील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या दुर्घटनेत एका मुलीसह 9 लोक गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना पुन्नई सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोणम सरकारी रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी क्रेनच्या आसपास सुमारे 1500 भाविक उपस्थित होते. नेमिली जिल्हाधिकारी सुमती, ग्राम प्रशासकीय अधिकारी मणिकंदन आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"