शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

देशात तीन लाख नवे उद्योजक तयार करणार

By admin | Published: January 17, 2016 2:04 AM

भारतात स्टार्टअप योजनेद्वारे येत्या दोन वर्षात किमान तीन लाख नवे उद्योजक तयार होतील. १९९१ साली भारतात पारंपरिक ‘लायसेन्स राज’ समाप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली

नवी दिल्ली : भारतात स्टार्टअप योजनेद्वारे येत्या दोन वर्षात किमान तीन लाख नवे उद्योजक तयार होतील. १९९१ साली भारतात पारंपरिक ‘लायसेन्स राज’ समाप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी ती पूर्णपणे संपुष्टात आली नव्हती. परंतु स्टार्ट अप योजनेचा प्रारंभ देशातील लायसन्स राजशी अखेरची फारकत ठरणार आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी स्टार्ट अप इंडिया योजनेच्या संमेलनात केला.दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्टअप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेचे औपचारिक उद्घाटन झाले.जगभरातील १५०० स्टार्टअप कंपन्यांचे प्रमुख या संमेलनाला उपस्थित आहेत. त्यात अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपन्यांच्या ४८ प्रतिनिधींचाही समावेश आहे. भारतात स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयआयटी, आयआयएम, एनआयटी, केंद्रीय विद्यापीठे व देशातील ३५० जिल्ह्यातील तरुणांच्या समूहांकरिता या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाने इन्व्हेस्ट इंडिया, निवडक स्टार्टअप कंपन्या, फिक्की व सीआयआयच्या युवा उद्योग शाखांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बँक सार्वजनिक असो की खासगी, त्यांची प्रत्येक शाखा अनुसूचित जाती जमातींपैकी एक व महिला वर्गाची एक अशा दोन स्टँड अप उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यापासून त्याच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यापर्यंत सर्व जबाबदारी उचलणार आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)स्टार्टअप योजनेच्या वैशिष्ट्यांची माहिती देताना अर्थमंत्री जेटली म्हणाले, केंद्र सरकारने उद्योगांना अनुकूल करप्रणालीचा सखोल विचार केला आहे. फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअप उद्योगांना विशेष प्रोत्साहन देणाऱ्या अनुकूल करप्रणालीचा अवलंब केला जाईल. इतकेच नव्हे, तर तमाम बँका आणि केंद्र सरकार या नव्या उद्योजकांना उद्योगांची साधनसामग्री उभी करण्यास पुरेपूर मदत करेल. येत्या काही महिन्यात बँका अधिक कर्जपुरवठा करण्याच्या स्थितीत येतील, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.