शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गावठी दारुचे तीन लाखाचे रसायन उद्ध्वस्त राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : दोन जणांना अटक, पहाटेच्या सुमारास राबविले कारवाई सत्र

By admin | Published: January 22, 2016 10:41 PM

फोटो

फोटो
जळगाव: गावठी दारुमुळे शहरात दोन जणांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवार व शुक्रवारी जिल्‘ात धडक कारवाईची मोहीम राबवून दोन लाख ९२ हजार ७६७ रुपयांचे रसायन व गावठी दारु नष्ट केली. यावेळी दारुच्या भट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील गेंदालाल मील भागात दोन दिवसापूर्वी गावठी दारुमुळे दोन जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांनी शहरात कुठे दारुच्या भट्या आहेत तसेच कुठून दारुची आयात होते याचा आढावा घेवून विभागीय निरीक्षक सी.पी.निकम यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी पहाटे सहा वाजता गिरणा नदी पात्राशेजारी कांताई बंधार्‍याला लागून कढोली शिवारात छापा टाकला. वाल्मिक रामा कोळी हा गावठी दारू गाळत असताना रंगेहाथ सापडला. तर गुलाब सीताराम तायडे हा गावठी दारुची वाहतूक करताना आढळला.यावेळी भ˜ी उद्ध्वस्त करुन एक लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एक दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.बी.१५७६) ताब्यात घेण्यात आली. विभागीय निरीक्षक सी.पी.निकम, दुय्यम निरीक्षक जी.बी.इंगळे, एम.पी.पवार, जमादार एम.आर.वाघ, एच.एन.ब्राšाणे, भूषण वाणी, प्रवीण वाघ, संतोष निकम, मुकेश पाटील, यशोधर जोशी, नंदू पवार व व्ही.बी.परदेशी यांनी ही मोहीम राबविली.
दुर्गम भागातही धाडसत्र
मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या पाडला ता.रावेर या अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारुच्या भट्या असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार तेथेही पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता दारु गाळणारे फरार झाले, मात्र भ˜ा उद्ध्वस्त करुन ८१ हजार ९९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील तापी काठी असलेल्या भाणखेडा, शिवपूर कन्हाळा तसेच जळगाव शहरातील कंजरवाडा, सिंगापुर, तांबापुरा व जाखनी नगर आदी ठिकाणी ११ हजार ४५० लीटर रसायन व ३७४ लीटर दारू जप्त करण्यात आली.
कोट..
गावठी दारुविरुध्द कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. दोन दिवसात लाखो रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. यापुढेही कारवाईची मोहीम सुरुच राहणार आहे. नागरिकांनी माहिती कळवावी, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
-सी.पी.निकम, विभागीय निरीक्षक