शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

बनावट डीडी देऊन तीन लाखांची फसवणूक तीन दुकानदारांची तक्रार

By admin | Published: June 01, 2015 10:13 PM

अहमदनगर : शहरातील तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमधून एका भामट्याने तीन वेगवेगळे डिमांड ड्राफ्ट देऊन दुकानमालकांची तीन लाख रुपयांना फसवणूक केली आहे. डिमांड ड्राफ्ट दिल्यानंतर त्या भामट्याने एका टेम्पोतून किमती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेल्या. ड्राफ्ट वठला न गेल्याने ही फसवणूक झाल्याचे उघड झाले.

अहमदनगर : शहरातील तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमधून एका भामट्याने तीन वेगवेगळे डिमांड ड्राफ्ट देऊन दुकानमालकांची तीन लाख रुपयांना फसवणूक केली आहे. डिमांड ड्राफ्ट दिल्यानंतर त्या भामट्याने एका टेम्पोतून किमती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेल्या. ड्राफ्ट वठला न गेल्याने ही फसवणूक झाल्याचे उघड झाले.याबाबत तीन दुकानदारांनी एकत्र दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीपेठेतील इझी इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक जोहर सालेभाई रामपूरवाला (वय ५०, रा. कोहिनूर प्लाझा, पत्रकार चौक) यांनी फिर्याद दिली आहे. रामपूरवाला यांच्या दुकानात २० मे रोजी महेश भाई नावाचा इसम आला. आठ दिवसांनी माझा एक व्यक्ती डीडी घेऊन येईल, त्याला तुमच्या दुकानातील दोन ए.सी., एक एलईडी अशा वस्तू देण्याचे सांगितले. महेश भाई याने यावेळी साई ट्रेडिंग कंपनी शॉप नं. ३१/१२, साई कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ, सातारा असा पत्ता सांगितला. २९ मे रोजी महेश भाई यांचा प्रतिनिधी सागर पाचपुते दुकानात आला. त्याने सिंडिकेट बँकेचा १ लाख १५ हजार रुपये किमतीचा डिमांड ड्राफ्ट दिला ए.सी. आणि एलईडी नेला. मर्चंट बँकेत दिलेला डीडी बनावट असल्याने तो वठला नाही, असे बँकेने स्पष्ट केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.दुसरे तक्रारदार सुनील गिरीधरदास पारेख (वय ५०, रा. घुमरे गल्ली) यांच्याही दुकानातून ८० हजार ६४० रुपयांचा ड्राफ्ट देऊन विविध प्रकारचे कॉक घेऊन गेला. तिसरी तक्रार यश कॉम्प्युटरचे हर्षद संजय भंडारे (रा. बुरुडगाव रोड, स्वाती कॉलनी) यांनी दिली. त्यांच्याकडे १ लाख १०० रुपयांचा डीडी देऊन लॅपटॉप घेऊन गेला. या तिन्ही दुकानातून २ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.-----------तिघांनाही एकाच क्रमांकाचा ड्राफ्टमहेश भाई यांच्या प्रतिनिधीने तिन्ही दुकानदारांना एकाच क्रमांकाचा आणि वेगवेगळ्या रकमेचा डीडी दिला. तिघांचेही डीडी बनावट असल्याने ते परत आले. त्यानंतरच दुकानदारांना ते वठले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.-----------