- सुरेश एस. डुुग्गर श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवनी भागामध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये बुधवारी पहाटेपासून पुढे काही तास चकमक सुरू होती. मात्र, सुरक्षा दलाने घेरलेले तीनही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या चकमकीमध्ये सीआरपीएफचा जवान सदा गुणकारा राव हा शहीद तर चार काश्मिरी युवक ठार झाले.खुदवनीमध्ये झेलम नदीच्या किनाऱ्यावरील एका घरात दहशतवादी लपले होते. सुरक्षा जवानांनी बुधवारी पहाटे या परिसराला वेढा दिला. दहशतवाद्यांनी जवानांवर प्रथम ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर, गोळीबार केल्याने जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबार चालू असतानाच तिथे नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दहशतवादी व सुरक्षा दल परस्परांवर करीत असलेल्या गोळीबारात चार काश्मीरी युवकही मरण पावले. सुरक्षा दलाने घेरलेले तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, त्यातील एक जण जखमी झाला. जखमी जवानावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.>इंटरनेट सेवा बंदतणाव वाढू नये, कुलगाम व अनंतनागमधील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बनिहाल- श्रीनगर दरम्यानची रेल्वे वाहतूकही काही काळ थांबविण्यात आली. शिक्षणसंस्थांना सुट्टी देण्यात आली.>१६ महिन्यांत ५८ ठारगेल्या १६ महिन्यांत काश्मीरमध्ये दगडफेक करणाºयांवर सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात ५८ नागरिक ठार झाले आहेत.>महेबुबा मुफ्ती यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेटजम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राज्यातील हिंसाचाराबाबत आणि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.
चकमकीदरम्यान तीन दहशतवादी निसटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:47 AM