शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुलवाम्यातील चकमकीत तीन दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 3:52 AM

अनंतनाग जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर एक लहान मुलगा मरण पावला.

श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफली व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अन्य घटनेत अनंतनाग जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर एक लहान मुलगा मरण पावला.पुलवामाच्या त्राल येथे चेवा उलार भागात दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोहीम हाती घेतली होती. तिथे दहशतवादी दडून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे वेढा घातला, त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चेवा उलार परिसराची सुरक्षा दलाच्या जवानांनी नाकाबंदी केली आहे.या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा सुरक्षा दलाच्या जवानांनी कसून शोध घेतला. काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रे व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)>अब्दुल्लांकडून निषेधअनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद व आठ वर्षे वयाचा एक मुलगा ठार झाला आहे.बिजबेहरा येथील पादशाही बाग ब्रिजजवळ सीआरपीएफ ९० बटालियनच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव शामलकुमार असून, ठार झालेल्या मुलाचे नाव निहान यावर असे आहे. निहान हा कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागातील रहिवासी होता.हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा जवानांनी बिजबेहरा परिसराची नाकाबंदी केली आहे. अल्पवयीन मुलाची हत्या करणाºया दहशतवाद्यांचा नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र निषेध केला आहे.