जलवाहिनी गळती सापडेना तीन वेळा खणला खड्डा : रात्री उशीरा सापडली गळती
By admin | Published: January 22, 2016 10:41 PM
जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीला मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम शुक्रवार, २२ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. मात्र सायंकाळी ८ वाजेपर्यंत तीन ठिकाणी खड्डा खणूनही गळती शोधण्यात अपयश आले होते. अखेर रात्री उशिरा गळती सापडली.
जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीला मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम शुक्रवार, २२ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. मात्र सायंकाळी ८ वाजेपर्यंत तीन ठिकाणी खड्डा खणूनही गळती शोधण्यात अपयश आले होते. अखेर रात्री उशिरा गळती सापडली.रविवारी पाणीपुरवठा उशिरानियोजनानुसार तब्बल ३० तास हे दुरुस्तीचे काम चालणार असल्याने शनिवार, २३ रोजीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तो २४ रोजी नियमित वेळेवर होईल, असे आधी पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र गळती शोधण्यास विलंब लागल्याने प्रत्यक्ष गळती दुरुस्तीच्या कामास सुरुवात होण्यास विलंब झाला. त्यामुळे रविवारी पाणीपुरवठा उशिराने होण्याची शक्यता पाणीपुरवठा अभियंता यांनी व्यक्त केली.---- इन्फो---तीन वेळा खोदला खड्डागळती दुरुस्तीसाठी जेसीबीद्वारे पाणी वाहत असलेल्या ठिकाणी सकाळी १० वाजता खड्डा खोदण्यास सुरुवात झाली. खड्डा खोदल्यावर तेथे गळती आढळली नाही. पाणी वरून येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वरच्या बाजूला दुसरा खड्डा खोदण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र तेथेही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने तिसरा खड्डा खोदण्यास प्रारंभ झाला. ते काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.थंडीमुळे अडथळागेल्या दोन दिवसांपासून शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्री पाणी व चिखलात काम करण्यास अडथळा येत होता. कामगारांना गारठ्यात कुडकुडतच काम करावे लागत होते.