पाटणा - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काल लालूंच्या आरजेडीने सत्ताधारी जेडीयूमध्ये फूट पाडत सरकारमधील एका मंत्र्याला आपल्याकडे वळवत नितीश कुमार यांना धक्का दिला होता. मात्र याला २४ तास उलटत नाहीत तोच जेडीयूने आऱजेडीच्या तीन आमदारांना आपल्या गोटात वळवले आहे.आरजेडीचे आमदार अशोक कुमार कुशवाह, प्रेमा चौधरी आणि महेश्वर यादव यांना जेडीयूने आपल्याकडे वळवले आहे. प्रेमा चौधरी ,महेश्वर यादव आणि फराज फातमी यांना पक्षविरोधी केल्याच्या आरोपाखाली आरजेडीमधून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. दरम्यान, फराज फातमी हे सध्यातरी जेडीयूमध्ये प्रवेश करणार नाहीत.प्रेमा चौधरी, महेश्वर यादव आणि फराज फातमी हे निवडणुकीपूर्वी जेडीयूमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, पक्षाध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या सूचनेनुसार या तिघांचीही पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.दरम्यान, नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री असलेल्या श्याम रजक यांनी मंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर आज राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केला आहे. तेजस्वी यादव यांनी रजक यांनी पक्षसदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान, राजदमध्ये प्रवेश केल्यानंतर श्याम रजक यांनी मी माझ्या घरवापसीमुळे खूश आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आता राजदमध्ये पुन्हा आल्यानंतर सामाजिक न्यायाची लढाई पुन्हा लढती जाईल, असे रजक यांनी सांगितले.
एकाच्या बदल्यात तीन, बिहारच्या राजकारणामध्ये रंगलीय पळवापळवी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 5:37 PM
पाटणा - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काल लालूंच्या आरजेडीने सत्ताधारी जेडीयूमध्ये फूट ...
ठळक मुद्देतर नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री असलेल्या श्याम रजक यांनी आज राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केलाजेडीयूने आऱजेडीच्या तीन आमदारांना आपल्या गोटात वळवले आमदार अशोक कुमार कुशवाह, प्रेमा चौधरी आणि महेश्वर यादव यांना जेडीयूने आपल्याकडे वळवले