शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:26 AM

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षारक्षकांनी उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे.जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली.

श्रीनगर - भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादीजैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी (24 मार्च) पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. कारच्या तपासणीसाठी या तिघांना श्रीनगरच्या बाहेर परिमपोरा नाक्यावर थांबवण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचं समोर आलं. तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत मिळाली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे.   

जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये रविवारी भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. भारतीय सुरक्षादलांनी अखनूर सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्धवस्त केले आहे. पाकिस्तानने हा तळ अत्यंत गोपनीयरित्या उभारला होता. भारतीय लष्कराकडून पुरावा म्हणून याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा तळ दिसत आहे. तसेच त्यावर पाकिस्तानचा झेंडाही दिसून येत आहे. 

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला. हरी वाकेर असं या जवानाचं नाव असून ते गंभीर जखमी झाले होते. वाकेर यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (24 मार्च) मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (22 मार्च) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी सडेतोड उत्तर देत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. 

आई-वडिलांच्या आर्त विनवणीनंतरही दहशतवाद्यांनी मुलाला ठार केलं

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे क्रुर कृत्य पुन्हा एकदा समोर आलेले आहे. काश्मीरच्या  शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये या भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये अनेक दिवसांपासून चकमकी होत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी क्रुर कृत्य केलं. 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आर्त विनवणी करत आपल्या मुलाची सुटका करावी अशी हात दहशतवाद्यांना देत होते. मात्र आई-वडिलांच्या विनवणीनंतरही दहशतवाद्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अखेर त्या मुलाची दहशतवाद्यांनी हत्या केली. बांदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ला येथे 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याच दहशतवाद्यांनी मुलाला ओलीस ठेवले होते. तर आणखी एका ओलीस ठेवलेल्या नागरिकाला सोडविण्यात पोलिसांना यश आलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश आहे. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीर