श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यातील त्रालच्या सातोरा येथे आज सकाळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात दोन अतिरेकी मारले गेले. चकमक संपली असली तरी त्या भागात शोधमोहीम सुरू आहे. मारल्या गेलेल्या दोन जणांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात आले. शोधमोहिमेत आणखी एक अतिरेकी लपून बसल्याचे आढळले. तोही चकमकीत ठार झालादरम्यान, अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्लाप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्याच एका शिपायाला अटक केली आहे. सत्ताधारी पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीर यांच्या गाडीवर तो ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. या ड्रायव्हरची कसून चौकशी केली जाते आहे. पुलवामाचा रहिवासी असलेल्या या ड्रायव्हरचे नाव तौसीफ अहमद आहे.सात महिन्याआधी तौसीफला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सिक्युरिटी विंगमधून हटवून आमदारांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून पाठवण्यात आले होते. तौसीफचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे लक्षात आल्याने त्याची चौकशी केली जाते आहे, असे राज्याचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पाकिस्तानचा बदला घेईनकाश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले लान्सनायक रणजीत सिंह यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले, तेव्हा त्यांच्या सात वर्षांच्या मुलाने आपण लष्करात सहभागी होऊ न पाकिस्तानला धडा शिकवू, असा निर्धार सर्वांना सांगितला. त्यांची आठ वर्षांची मुलगी काजोल हिनेही आपण आयपीएस अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करू आणि शत्रूंशी सामना करू, असे सांगितले.आपल्या वडिलांचे पार्थिव पाहताच काजोलला अश्रू अनावर झाले होते. मात्र या परिस्थितीतही काजलने मोठा संयम आणि धीर दाखवला. एक दिवस मी नक्की आयपीएस होईन आणि दहशतवादाशी लढा देत वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेईन, असे ती म्हणाली.रणजीत सिंह जम्मू काश्मीरच्या भलवाल परिसरातील राहणारे आहेत. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. लान्सनायक रणजीत सिंह यांच्यासोबत रायफलमॅन सतीश भगत यांनाही वीरमरण आले होते. ते दोघेही सीमेवर तैनान होते. (वृत्तसंस्था)
तीन अतिरेक्यांना कंठस्नान
By admin | Published: July 16, 2017 1:47 AM