श्रीनगर - दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत १३ अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रीय अतिरेक्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.अधिकाºयांनी सांगितले की, शोपियांच्या काचदुरू भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे तीन जवान शहीद झाले. या ठिकाणाहून अतिरेक्यांचे तीन मृतदेह मिळाले आहेत. काचदुरू येथील मोहीम संपलेली आहे. सुरक्षा दल उद्या पुन्हा येथे तपास मोहीम राबविणार आहे.पोलीस महासंचालकांनी एका वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या प्रयत्नांचाही या वेळी उल्लेख केला. दायलगाम चकमकीच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी एका अतिरेक्याच्या नातेवाइकांना फोन केला. ते त्यांच्याशी ३० मिनिटे बोलले. जेणेकरून, या अतिरेक्याला आत्मसमर्पण करण्यासाठी तयार केले जावे. मात्र, या अतिरेक्याने आपल्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकलेनाही. या अतिरेक्याने पोलिसांच्या दिशेने फायरिंग केली. त्यानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा अतिरेकीमारला गेला, तर अन्य एक जण जिवंत पकडला गेला.चकमकी नेमक्या कोठे?काश्मिरात द्रगादमध्ये झालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व सात अतिरेकी स्थानिक रहिवासी होते. याशिवाय शोपियांच्या काचदुरू भागात, तसेच दायलगाम भागात ही चकमक झाली.स्थानिक उतरले रस्त्यावरकाचदुरूतील चकमकीबाबत महासंचालकांनी सांगितले की, तेथे चार ते पाच अतिरेकी असल्याची माहिती आमच्याकडे होती. मात्र, येथील पूर्ण झडती झाल्यानंतरच त्याबाबत आम्ही सांगू शकू. शोपियां जिल्ह्यात एक आणि काचदुरूत एक अशा दोन नागरिकांचा मृत्यू झाला. काचदुरूत चकमक सुरू असताना हिंसाचार उसळला. यात पेलेट गनने २५ नागरिक जखमी झाले, तर ६ अन्य नागरिकांना गोळ्या लागल्या. द्रगादमध्ये झालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व सात अतिरेकी स्थानिक रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह मागितले आहेत. शोपियांतही चकमकीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा झाले होते.लेफ्टनंट उमर फय्याज यांच्या मृत्यूचा बदलाअवंतिपुरातील व्हिक्टर फोर्स मुख्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट उपस्थित होते.हे सर्वात मोठे अभियान होते, असे सांगून भट्ट म्हणाले की, लेफ्टनंट उमर फय्याजच्या मृत्यूचा बदला घेण्यात आला आहे. गतवर्षी मे महिन्यात अतिरेक्यांनी शोपियांत फय्याज यांना मारले होते.दक्षिण काश्मिरच्या शोपियां जिल्ह्यात हरमैन भागात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. आज मारण्यात आलेल्या अतिरेक्यांत इश्फाक मलिक आणि रईस ठोकर यांचा समावेश आहे. फय्याज यांच्या हत्येसाठी हेचजबाबदार होते.
तीन ठिकाणी चकमक : १३ अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 5:58 AM