श्रीनगर : काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्थान घातले. शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत हे तिन्ही दहशतवादी ठार झाले. या घटनेनंतर त्या भागात तणावाचे वातावरण असून, सोपोरमधील शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली.त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. त्यांना ठार केल्यानंतर तो ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात तीन एके-४७ बंदुकांचाही समावेश आहे. चकमीकमध्ये एक जवानही जखमी झाला आहे.तिघे दहशतवादी सोपोर अमरगढ भागात येणार असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे सीआरपीएफ आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी तो भाग घेरला. त्यानंतर ते नेमके कुठे आहे, हे कळताच, त्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांच्या दिशेने गोळीबारसुरू केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जवानांनीही त्यांच्या दिशेनेगोळीबार केला. बराच काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.या गोळीबार तिघे दहशतवादी ठार झाले असून, एक जवान जखमी झाला आहे. (वृत्तसंस्था)तीन जण जखमीलष्कराच्या वाहनावर दगडफेक करणाºया जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन नागरिक जखमी झाल्याची माहिती आज देण्यात आली. बांदिपोरा भागात हा प्रकार घडला. त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. असाच आणखी एक प्रकार अनंतनाग जिल्ह्याच्या हरनाग भागातही घडला. तिथेही लष्कराच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. त्या जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करण्यात आला. पण त्यात कोणीही जखमी झाले नाही.
काश्मीरमध्ये तीन अतिरेकी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 11:42 PM