शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदतवाढ; निवडणूक आयोगाकडून नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 9:16 AM

शरद पवार व अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली कागदपत्रे परस्परांनाही द्यावीत, असा आदेश आयोगाने दिला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट व अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हासंदर्भात बजावलेल्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.

निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हाबाबत २७ जुलै रोजी बजावलेल्या नोटिसीवर उत्तर सादर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. शरद पवारअजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली कागदपत्रे परस्परांनाही द्यावीत, असा आदेश आयोगाने दिला होता. 

बंडखोर गटाने अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तसा प्रस्ताव मंजूर केला आहे, अशा आशयाची प्रतिज्ञापत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, विधानसभेतील आमदार, विधान परिषद सदस्य, अशा ४० जणांनी निवडणूक आयोगाला सादर केली होती. यासंदर्भातील पत्र ३० जूनला निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारून सर्वांना चकित केले, तसेच अजित पवार व त्यांचे काही सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री व अन्य आठ सहकारीमंत्री झाले.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार