शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

सुप्रीम कोर्टात प्रथमच असणार तीन महिला न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:43 AM

न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नियुक्तीने ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायाधीश न्यायपीठावर स्थानापन्न होणार आहेत.

नवी दिल्ली : न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नियुक्तीने ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायाधीश न्यायपीठावर स्थानापन्न होणार आहेत. न्या. बॅनर्जी यांच्या नियुक्तीचा राष्ट्रपतींचा औपचारिक आदेश शुक्रवारी रात्री जारी झाला.न्या. बॅनर्जी रुजू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यासह न्या. आर. भानुमती व न्या. इंदू मल्होत्रा अशा तीन महिला न्यायाधीश होतील. न्या. भानुमती जुलै २०२० मध्ये, न्या. मल्होत्रा मार्च २०२१ मध्ये व न्या. बॅनर्जी सप्टेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होतील. म्हणजेच पुढील किमान दोन वर्षे सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची तीन ही संख्या कायम राहील. एकूण २५ पैकी तीन हे महिला न्यायाधीशांचे प्रमाणही आजवरचे सर्वाधिक असेल.सन १९५२ ते १९८९ पर्यंत सर्वोच्च न्यायालयावर सर्व न्यायाधीश फक्त पुरुषच नेमले गेले. त्यानंतर आताच्या तिघी धरून आतापर्यंत या न्यायालयावर नेमलेल्या महिला ऩ्यायाधीशांची संख्या सात होईल. याआधी न्या. फितिमा बिवी, न्या. सुजाता मनोहर, न्या. रुमा पाल, न्या. ज्ञानसुधा मिश्रा व न्या. रंजना देसाई या महिला न्यायाधीश नियुक्त झाल्या होत्या. तरीही लगोलग निवृत्त्यांमुळे न्यायालयावर एकाहून अधिक महिला न्यायाधीश एकाच वेळी असण्याचा काळ फार कमी होता.>काश्मीरमध्येही पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशन्या. गीता मित्तल यांच्या नियुक्तीने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयासही पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लाभणार आहेत. किंबहुना न्या. मित्तल या त्या उच्च न्यायालयावरील पहिल्या महिला न्यायाधीश असतील. याआधी त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होत्या.न्या. जोसेफ व न्या. सरन यांचीही नियुक्ती जाहीर : ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. विनित सरन व उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या सुप्रीम कोर्टावरील नियुक्तीचे आदेशही राष्ट्रपतींनी जारी केले. न्या. बॅनर्जी, न्या. सरन व न्या. जोसेफ या तिघांच्या नेमणुकीने तेथील न्यायाधीशांची संख्या २५ होईल. न्यायाधीशांची आणखी सहा पदे रिक्त आहेत.>न्या. विजया ताहिलरामाणी मद्रासच्या चिफ जस्टिसमुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कमलेश ताहिलरामाणीयांची राष्ट्रपतींनी मद्रास उच्च न्यायालयावर मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. त्या बहुधा सोमवारी नव्या पदावर रुजू होतील. याखेरीज आणखीही पाच उच्च न्यायालयांवर नवे मुख्य न्यायाधीश नेमले गेले आहेत. ते असे : न्या. हृषिकेश रॉय (केरळ), न्या. एम. आर. शहा (पाटणा), न्या. राजेंद्र मेनन (दिल्ली), न्या. अनिरुद्ध बोस (झारखंड) आणि न्या. कल्पेश झवेरी (ओडिशा)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय