ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला उत्तर देणे सरकारचं काम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरुन मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, आज स्वातंत्रवीर सावरकरांची जयंती , देशातील तरूणांना स्वातंत्र्यसैनीक आणि त्यांच्या आयुष्याबद्दल रुची आहे , ही महत्त्वाची गोष्ट आहे. देशाच्या महापुरुषांनी तुरुंगात असताना लेखनाचे मोठे कार्य केले, ज्यातून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, सुटीच्या कालावधीत तुम्ही नेहमीपेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे, माझ्या प्रत्येत आवाहनाला देशवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरणासोबत संवाद म्हणजे स्वत:शी संवाद , यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि वक्षारोपणासाठी योगदान द्या असे अवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करणाऱ्या अफरोज शाहचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये कौतूक केले.