ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसभेत संपूर्ण बहुमत लाभलेल्या कोणत्याही सरकारसाठी पहिले तीन वर्ष तसे आव्हानात्मक, आश्वासक आणि दिशादर्शक असतात. या तीन कसोट्यांवर मोदी सरकारच्या कामगिरीचे लोकमतच्या लाखो वाचकांनी केलेले मूल्यमापन लक्षात घेतले, तर जनतेच्या मनावर आजही मोदींचे गारूड कायम असल्याचे दिसून येते. नोटाबंदीच्या निर्णयावर कितीही टीका झाली असली तरी, लोकांनी याच निर्णयावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. विकासाचा अजेंडा, गतिमान प्रशासन, भ्रष्टाचारावर अंकुश या मुद्यांवर सरकाराची कामगिरी उत्कृष्ट श्रेणीत असली तरी बेरोजगारी, महिलांना सुरक्षा, दारिद्रयनिर्मुलन आदी विषयांवर अजून बरेच काम बाकी आहे.शिवाय, मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी वगळता इतर मंत्र्यांची कामगिरी तितकी सरस असल्याचे दिसून येत नाही. संरक्षणासारखे महत्वाचे खाते, मंत्र्याविना ठेवणे देशाच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने चांगले नाही. सध्या या खात्याचा अतिरिक्त पदभार अर्थमंत्री अरुण जेटली सांभाळत आहेत.काश्मीरच्या प्रश्नावरही आणखी कठोर भूमिका हवी, अशी अपेक्षा वाचकांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकार आल्यापासून जातीयवादी शक्तिंना खतपाणी मिळत असल्याची भावना वाढीस लागली आहे. असहिष्णुतेच्या नावाने उठलेले वादळ शमले असले तरी दादरी, सहारणपूरसारख्या घटनांची पुनर्रावृत्ती होत राहिली तर या सरकारच्या प्रतिमेवर तो कलंक असेल. राष्ट्रवादाच्या उन्मादातून सामाजिक हिंसा घडवून आणणाऱ्या शक्तींना वेळीच आवर घातला गेला नाही, तर विकासाच्या अजेंड्यांवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘अच्छे दिना’चे स्वप्न अजून प्रत्यक्षात साकारले गेले नसले, तरी सरकारची वाटचाल आश्वासक असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेतून समोर येतो.
1)मोदी सरकारकडून तीन वर्षांमध्ये तुमच्या अपेक्षांची पूर्तता होतेय का?
2)पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार संपेल, असे म्हटले होते. भ्रष्टाचार थांबला आहे का?
3)मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात विकास झाला, असे वाटते का ?
4) सरकारने घेतलेल्या या निर्णयांपैकी तुम्हाला आवडलेला निर्णय कोणता?
5) मोदी सरकारच्या काळात देशातील गरिबी कमी झाल्याचे तुम्हाला वाटते का?
6) मोदी सरकार आल्यापासून महागाई वाढली की कमी झाली?
7)मोदी सरकारच्या काळात शासन दरबारी जलद गतीने कामं होतात का?
9)मोदी सरकार निर्णय घेताना यापैकी कोणाचा अधिक विचार करते असे वाटते?
10)मोदी सरकार आल्यापासून महिलांना सुरक्षेची हमी मिळाली का?
11)मोदी सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत देशात असहिष्णुता वाढली आहे का?
12)या सरकारमुळे जातीयवादी शक्तींना बळ मिळतंय, असे वाटते का?
13)दहशतवाद, नक्षलवाद याविषयी मोदी सरकारची भूमिका कशी वाटते?
14)मोदी सरकार काश्मीर प्रश्न कसा हाताळत आहे?
15)मोदी सरकारचे पाकिस्तानसंबंधीचे धोरण कसे आहे?
18) तुमच्या मनात पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा कशी आहे?
19) पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची तीन वर्षांची कारकीर्द कशी वाटते?
21) मोदी यांचा करिष्मा तीन वर्षांनंतरही कायम आहे असे वाटते का?
ग्राफिक्स : प्रदीप सूर्यवंशी, अमित भेरेरेखाचित्र : अमोल ठाकूर