गुना: मध्य प्रदेशातील गुना येथे शनिवारी पहाटे 3 ते 4च्या सुमारास काळ्या हरणांची शिकार करण्यासाठी आलेले शिकारी आणि पोलिसांमध्ये भीषण चकमक झाल्याची घटना घडली. या घटनेत एका SI सह तीन पोलीस शहीद झाले तर दोन हल्लेखोर शिकाऱ्यांना ठार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, भाचीच्या लग्नात आलोल्या पाहुण्यांना हरणाचे मांस खाऊ घालण्यासाठी ही शिकार करण्यात आली.
ही घटना गुनाच्या आरोनची आहे. शिकारी नौशाद याच्या भाचीचे शनिवारी लग्न होते. नौशाद याने लग्नात आलेल्या पाहुण्यांना वन्य प्राण्यांचे मांस खाऊ घालायचे ठरवले. यासाठी तो आपल्या साथीदारांसह जंगलात गेला आणि पाच हरीण आणि एका मोराची शिकार केली. प्राण्यांना घेऊन दुचाकीवरून परतत असताना त्यांचा सामना पोलिसांशी झाला. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळ्या चालवल्या. या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाल, तर नौशाद तिथेच मारला गेला, तर त्याचा शहजाद दुसऱ्या चकमकीत ठार झाला. पोलिस तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मिळणार या घटनेत इन्स्पेक्टर राजकुमार जाटव, कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम शहीद झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपीच्या घरावर बुलडोझर या घटनेनंतर आरोपीच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला. तसेच, ग्वाल्हेरचे आयजी अनिल शर्मा यांना या प्रकरणी त्वरित कारवाई न केल्याने त्यांना हटवण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात म्हटले की, राज्यात कोणत्याही गुन्हेगारावर अशाप्रकारची कठोर कारवाई केली जाईल. कोणताही गुन्हेगार असो, तो कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही.