शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

तिबेटी, ज्यू, चकमा, सिंधींपासून रोहिंग्यांपर्यंत भारताने दिला अनेक स्थलांतरित समुदायांना आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 1:42 PM

गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात भारताने विविध जाती धर्माच्या, वंशाच्या लोकांना आश्रय दिला आहे. कधीकाळी सत्ता गाजवायला आलेल्या परकीयांनाही भारतीय संस्कृतीने सामावून घेतले आहे. रोहिंग्यांना भारतात राहू द्यावे की नाही याबाबत चर्चा सुरु असताना भारताच्या आजवरच्या आदरातिथ्यावर प्रकाश टाकता येईल.

ठळक मुद्देभारताने विविध धर्माच्या, वंशाच्या, देशांच्या लोकांना राहण्यास संधी दिली आहे.एकेकाळी राज्य करण्यासाठी आलेले परकीयही याच मातीशी एकरुप होऊन गेले. अतिथीदेवो भव या भारतीय संस्कृतीचा लाभ तिबेटी बौद्धांपासून श्रीलंकन तमिळ लोकांपर्यंत अनेक समुदायंनी घेतला आहे.

मुंबई, दि. 15- अतिथी देवो भव किंवा घरी आलेल्या पाहुण्याची सर्व प्रकारे काळजी घ्या ही केवळ प्राचीन भारतीय ग्रंथांमधील शिकवण नाही तर भारतीयांनी ती वृत्ती अंगी बाणवलेली आहे. गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात भारताने विविध जाती धर्माच्या, वंशाच्या लोकांना आश्रय दिला आहे. कधीकाळी सत्ता गाजवायला आलेल्या परकीयांनाही भारतीय संस्कृतीने सामावून घेतले आहे. रोहिंग्यांना भारतात राहू द्यावे की नाही याबाबत चर्चा सुरु असताना भारताच्या आजवरच्या आदरातिथ्यावर प्रकाश टाकता येईल.

स्वातंत्र्यापुर्वीचे स्थलांतरितसुमारे दोन हजार वर्षांपुर्वी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकणात नौगांव आणि केरळमध्ये ज्यूंच्या बोटी लागल्या. संपुर्ण जगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या या ज्यूंना भारताने आपलेसे केले, त्यांना व्यवसाय करण्याचा, मालमत्ता कमावण्याची संधी मिळवून दिली. ज्यूंचा छळ झाला नाही असा भारत हा एकमेव देश आहे. केरळमध्ये सीरियन, कोकणात व महाराष्ट्रात बेने इस्रायली, कलकत्त्यात बगदादी आणि ईशान्य भारतात बेने मनाशे या ज्यूंनी आश्रय घेतला. त्यातील बहुतांश ज्यू इस्रायलची निर्मिती झाल्यावर तिकडे निघून गेले तर काही आजही येथे राहात आहेत. चित्रपट, उद्योग, लष्कर अशा सर्व विविध क्षेत्रांमध्ये ज्यू बांधवांनी योगदान दिले. त्यानंतर महत्त्वाचा समुदाय भारतात आला तो पारशी धर्मियांचा. इराणमधील हिंसेला कंटाळून हे पारशी बांधव गुजरातच्या संजाणला आले. येथे त्यांना व्यवसायाची संधी देण्यात आली. गुजरात, मुंबई आणि पुण्यासारख्या विविध भागांमध्ये ते स्थायिक झाले. देशाच्या महत्त्वाचे उद्योग आणि व्यवसाय, बॅंका निर्माण करण्यासाठी पारशी लोकांचा हातभार लागलेला आहे. भारतात एकेकाळी सत्ता गाजवणारे मुघलही येथेच मिसळून गेले. त्यानंतर व्यापार आणि लष्करात तसेच गुलामीसाठी आलेले सिद्दीही भारतीय संस्कृतीचा भाग बनून गेले. अॅबिसिनियातून आलेले हे लोक मुघल, निजामाच्या लष्करामध्ये सेवा देत होतेच त्याहून जंजिरा, सचिन, जाफ्राबाद संस्थानचे ते राजेही झाले. आज देशातील काही प्रांतात सिद्दींना अनुसुचित जमातींचा दर्जा मिळालेला आहे. या प्रकारे स्वातंत्र्यापुर्वी भारत हा विविध समुदायांसाठी यजमान देश झाला होता. 

पाकिस्तानातून आलेले स्थलांतरीत20 व्या शतकाच्या पुर्वार्ध आणि मध्यंतरात भारतात आश्रितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. पाकिस्तान नावाचा देश भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूस निर्माण झाला तेव्हा दोन्ही दिशांनी भारतात लोक येऊ लागले. 1947 च्या फाळणीच्या वेळेस 72 लाख लोक भारतात आले अशी आकडेवारी सांगते. भारतीय उपखंडात त्यानंतर पाकिस्तानची 1971 साली पुन्हा फाळणी झाली. 1971च्या आसपास पश्चिम पाकिस्तानने लष्कराच्या बळावर  पूर्व पाकिस्तानमध्ये दडपशाही सुरु केल्यावर  स्थलांतरितांचे मोठे लोंढे भारतात आले. पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाला देशातील विविध प्रांतामध्ये स्थायिक होण्याची, व्यवसाय करण्याची संधी देण्यात आली. आज सिंधी भाषा, संस्कृती व उद्योग अत्यंत जोमाने जोपासले जात असून सिंधी समाज एक प्रमुख व्यापारी समुदाय म्हणून ओळखला जातो. कापड व्यवसायामध्ये या समुदायाने नाव कमावले आहे.

बांगलादेशातून आलेले स्थलांतरितबांगलादेशच्या पूर्व भागात असणाऱ्या आणि म्यानामारला लागून असणाऱ्या चितगांव हिल टेरिटरी मध्ये चकमा हे बौद्ध आणि हाजोंग हे हिंदू लोक राहात होते. या लोकांना फाळणीमध्ये आपला प्रदेश भारतात येईल असे वाटत होते. मात्र रॅडक्लिफ यांनी कोलकाता बंदर भारताला आणि चितगांव बंदर पाकिस्तानला (पूर्व) देण्याचे निश्चित केल्यावर हा सगळा प्रांत पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशात गेला. तसेच येथे सिल्हेट या मुस्लीमबहुल जिल्ह्यातून मुस्लीम लोक येऊन राहू लागले. साहजिकच बौद्ध आणि हिंदूंचे प्रमाण कमी होऊ लागले. कर्णफुली येथील कागदप्रकल्प आणि कपताई जलविद्युत प्रकल्पामुळे या लोकांच्या जमिनी गेल्या तसेच त्यांचे उपजिविकेचे साधनही हिरावून घेण्यात आले. त्यामुळे 1961 साली 60 हजार चकमा व हाजोंग भारतात आले. सध्याचे मिझोरम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश येथे त्यांना वसवण्यात आले. तरिही मिझो जमातीचे लोक आणि अरुणाचलचे मूलनिवासी यांना हे बाहेरुन आलेले लोक आमच्या प्रदेशात प्रबळ होतील अशी भिती वाटत राहिली. तसेच यामुळे चकमाही स्वतःला असुरक्षित समजू लागले. त्यांनी स्वतंत्र चकमलॅंड राज्याची मागणीही केली होती. आता याच आठवड्यात भारत सरकारने चकमा आणि हाजोंग समुदायांच्या 1 लाख लोकांना नागरिकत्त्व देण्याचे जाहीर केले आहे.

तिबेटमधून आलेले स्थलांतरितचीनच्या साम्राज्यवादी धोरणाचा वरवंटा तिबेटवर फिरल्यावर तेथिल 14 वे दलाई लामा 80 हजार अनुयायांसह 1959 साली भारतात आले. गेल्या सत्तर वर्षांमध्ये दीड लाख तिबेटी भारतात येऊन स्थायिक झाले. त्यांना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला, कर्नाटकात म्हैसूर, कोडुगू, हसन, उत्तर कन्नड जिल्ह्यात छावण्या तयार करण्याची संधी देण्यात आली.

तिबेटी निर्वासित महिलांनी बांधली सरसंघचालकांना राखी

अफगाणिस्तान, श्रीलंकेतून आलेले स्थलांतरित1979-89 या दशकात सुरु असलेल्या सोव्हिएट रशिया आणि अफगाणिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुऎळे 60 हजार अफगाणी लोक भारतात आले तर श्रीलंकेत तामिळी वाघ आणि तेथिल सरकार यांच्यामध्ये झालेल्या दीर्घ यादवीला कंटाळून, जीव वाचवण्यासाठी 1 लाख लोक भारतात आले. हे लोक तामिळनाडूत चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोइमतूर, कर्नाटकात बंगळुरु आणि केरळमध्ये स्थायिक झाले.

म्यानमारमधून आलेले स्थलांतरित

 म्यानमारमधून भारतात रोहिंग्या तसेच हिंदूही येऊन राहिलेले आहेत. ब्रिटिशांच्या सेवेत असणारे नोकरदार, व्यापारी स्वातंत्र्यानंतर भारतात येऊन स्थायिक झाले. सध्या भारतात बेकायदेशीर रित्या 40 हजार रोहिंग्या राहात असून त्यांना परत पाठवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. हे रोहिंग्या भारता सर्वात जास्त जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असून आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यातही ते राहात आहेत.

रोहिंग्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

देशांतर्गत स्थलांतर करणारे काश्मीर पंडितकाश्मीरी पंडित हा भारतातील सर्वात जास्त त्रास सहन करावी लागलेला समुदाय म्हणावा लागेल. आपल्याच देशात आश्रितांचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. काश्मीर खोऱ्यातील दहशतीला आणि हिंसेला कंटाळून या लोकांना देशात विविध ठिकाणी आश्रय शोधावा लागला आणि काही ठिकाणी रेफ्युजी कॅम्प्स मध्ये राहावे लागले.

भारतातील पोलिश आश्रितांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?भारतामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 साली पोलिश स्थलांतरित आश्रयास आले होते. गुजरातमधील नवानगरचे राजे महाराजा दिग्विजयसिंहदी रणजितसिंहजी जडेजा यांनी 640 पोलिश मुलांना आसरा दिला तर कोल्हापूरजवळील वळीवडे कॅम्प येथे अनेक पोलिश बांधव स्थायिक झाले. फाळणीनंतर या कॅम्पजवळ सिंधी लोक राहू लागले.

टॅग्स :Indiaभारत