शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 8:50 PM

IRCTC Aadhaar PAN Linking : आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय.

ठळक मुद्देआयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय.

ऑनलाईन ट्रेन तिकिट बुक करण्यासाठी आता आधार कार्ड आणि पॅन कार्डासाररखे डॉक्युमेंट्स लिंक करण्याची गरज भासू शकते. रेल्वेनंतिकिटांच्या नावावर होणारी फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. रेल्वेची ही योजना लागू झाली तर प्रवाशांना IRCTC च्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकिट बुक करण्यासाठी लॉग इन करतेवेळी आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक टाकावा लागू शकतो.

रेल्वे आयआरसीटीसीशी आयडेंटीटी डॉक्युमेंट्स जोडण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती आपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी शुक्रवारी दिली. "यापूर्वी फसवणुकीबद्दल जी कारवाई होत होती ती ह्युमन इंटेलिजन्सवर आधारित होती. परंतु त्याचा परिणाम तितका दिसत नव्हता. आम्ही अशा घटनांच्या विरोधात काम करत आहोत. तिकिट बुक करताना लॉग इनसाठी पॅन, आधार किंवा दुसऱ्या ओळखपत्रांना लिंक करावं लागेल असं आम्हाला वाटत आहे. यामुळे आम्ही दुसऱ्या प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवू शकू," असं त्यांनी नमूद केलं. 

आधारसोबत रेल्वेचं काम पूर्ण"यासाठी आम्हाला एक नेटवर्क तयार करावं लागेल. आम्ही आधार अथॉरिटीजसोबत काम पूर्ण केलं आहे. लवकरच आम्ही अन्य ओळखपत्रांसोबतही काम पूर्ण करू. हे काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही याचा वापर करणं सुरू करू. ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ पासून सुरू केलेल्या मोहिमेनंतर १४,२५७ दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत २८.३४ कोटी रूपयांची बनावट तिकिटं पकडण्यात आली आहेत. तक्रारी दाखल करण्यासाठी रेल्वे सुरक्षा अॅप विकसित करण्यात आलं आहे. रेल्वे सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी आरपीएफच्या व्यवस्थेत मजबूती आणली आहे. ६०४९ स्टेशन्स आणि सर्व पॅसेंजर्स ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील," असंही अरूण कुमार म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीticketतिकिटPan Cardपॅन कार्डAdhar Cardआधार कार्डIRCTCआयआरसीटीसी