भोपाळ: कान्हा व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील एका नरभक्षक वाघाला शनिवारी भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं. या वाघानं चंद्रपूरहून मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्ह्यात प्रवेश केला होता. या वाघानं ऑक्टोबर २०१८मध्ये तीन जणांची शिकार केली होती. त्याची शिक्षा म्हणून आता वाघाला त्याचं उर्वरित आयुष्य पिंजऱ्यात काढावं लागेल.नरभक्षक वाघाला पिंजऱ्यात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. वाघाला जंगलात सोडण्यात आलं होतं. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहण्यासाठी संधी दिल्या गेल्या. मात्र तो कायम मानवी वस्तीत शिरत होता. त्यामुळे त्याला एनटीसीएच्या नियमावलीनुसार माणसांसाठी धोकादायक घोषित करण्यात आलं. त्यामुळेच वाघाला आजन्म तुरुंगावासाची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०१८ मध्ये वाघ बैतूलमध्ये गेला होता. ११ डिसेंबर २०१८ रोजी बैतूल जिल्ह्यातल्या सारणीमधील नागरी वस्तीतून त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्याला सातपुड्याच्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पात सोडण्यात आलं. मात्र मानवी वस्तीजवळ जाण्याची सवय लागल्यानं तो पुन्हा नागरी वसाहतीजवळ पोहोचला. १० फेब्रुवारीला तो पुन्हा बेतूलच्या सारणी भागातील निवासी भागात गेला. तिथून त्याची रवानगी कान्हा व्याघ्र संवर्धन प्रकल्पात करण्यात आली. नरभक्षक वाघाचं वजन पाच वर्ष असून त्याचं वजन १८० किलो आहे. आता त्याला यापुढे वन विहार राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येईल. वन विहारमध्ये सध्या १४ वाघ आहेत. मात्र त्यातील चारच दृष्टीस पडतात. बाकीचे वाघ धोकादायक आहेत. तर काही वाघ अनाथ आहेत. त्यांना दूर पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे."येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरलरुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्..."कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"
महाराष्ट्रातून गेलेल्या 'त्या' नरभक्षक वाघाला आजन्म कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 7:20 PM