नवी दिल्ली:दिल्लीतील तिहार सेंट्रल जेलमध्ये पाच कैद्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी झालेल्या या प्रकारामुळे कारागृहात मोठी खळबळ उडाली. पण, कर्मचाऱ्यांनी वेळीच या कैद्यांना थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कैद्यांच्या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिहारच्या तुरुंग क्रमांक 3 च्या वॉर्ड क्रमांक 1 मधील पाच कैद्यांनी धारदार वस्तूने स्वतःला जखमी केले. नंतर प्रत्येकाने आपापल्या वॉर्डात छताला किंवा खिडकीला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, याची माहिती तेथे कर्तव्यावर असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांना मिळाली.
यानंतर त्या कैद्यांनी आरडाओरड करुन इतर कर्मचाऱ्यांना बोलावले आणि कैद्यांना वाचवले. या घटनेची संपूर्ण माहिती कारागृहातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्व जखमी कैद्यांना कारागृहातील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. तर, एका कैद्याला गंभीर अवस्थेत डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
तिहारमध्ये पहिल्यांदाच सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिहार तुरुंगात एकाच वेळी पाच कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे. मात्र, अनेकवेळा तिहार तुरुंगातील कैद्यांनी आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तिहारमध्ये नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर अनेक कैद्यांना जागेवरच वाचवण्यात यश आले