जयपूर : राजस्थानमध्ये इयत्ता आठवीसाठीच्या समाजशास्त्राच्या इंग्रजी पुस्तकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ओळख ‘दहशतवादाचे जनक’ (फादर आॅर टेररिझम) अशी दिली जाण्यावरून टीका झाल्यानंतर राजस्थानच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी सारवासरव करून त्या उल्लेखाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.राजस्थानचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीवासुदेव देवनानी यांनी एकानिवेदनात म्हटले की, पुस्तकात टिळकांचा ‘दहशतवादाचे जनक’ असा जो उल्लेख आहे त्याचा दहशतवादाच्या सध्याच्या व्याख्येने अर्थ लावणे चुकीचे आहे. हा शब्धप्रयोग स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात केलेला आहे व त्याचा अर्थ देश सोडून जाण्यासाठी इंग्रजांना भयभीत करणे एवढाच आहे.देवनानी यांनी असेही म्हटले की, इंग्रजांच्या मनात भीती निर्माण झाली तरच ते भारत सोडून जातील, असे स्वत: टिळकांचे म्हणणे होते. त्यामुळे काही संतापलेल्या इंग्रज इतिहासकारांनी ‘दहशतवादीचे जनक’ यासह इतरही अनेक शब्दप्रयोग टिळकांच्या संदर्भात केले. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ हल्लीच्या काळात दहशतवाद हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने केला जाऊ नये.ज्या पुस्तकात हा उल्लेख आहेते सरकारी शालेय पाठ्यपुस्तकनाही तर एका खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेले संदर्भ पुस्तकआहे, याचाही देवनानी यांनीपुनरुच्चार केला. मथुरा येथील‘स्टुडन्ट अॅडव्हायजस पब्लिकेशन्सप्रा. लि.’ या खासगी प्रकाशकानेसन २०१४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे.प्रकाशन संस्थचे एक अधिकारी राजपाल सिंग यांनी याआधी असे सांगितले होते की, भाषांतरकारानेही चूक केली आहे. ती लक्षात आल्यावर गेल्या महिन्यात सुधारित आवृत्ती काढताना ही चूक सुधारण्यात आली आहे. चूक असलेली पुस्तकाची आवृत्ती गेल्या वर्षी प्रसिद्ध झालीहोती. (वृत्तसंस्था)
टिळकांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख हल्लीच्या अर्थाने नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:19 AM