शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:37 PM

एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.  

ठळक मुद्दे१९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केलाचीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होतेतेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेली हिंसक झटापट आणि दोन्ही देशांचे लष्कर सध्या समोरासमोर येऊन उभे टाकल्याने प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या जगभरात झालेला कोरोनाचा फैलाव आणि चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देश चीनवर नाराज आहेत. मात्र थोडीफार आक्रमक विधाने वगळता कुठलाही देश चीनविरोधात आक्रमक झालेला दिसत नाही. आपल्या देशातूनही सध्या चीनविरोधात आक्रमक वक्तव्ये होत आहेत. मात्र एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.  

त्याचे झाले असे होते की, १९६२ च्या युद्धानंतर चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत होता. त्यासाठी चीनकडून वेगवेगळे आरोपही करण्यात येत होते. त्यातच १९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केला होता. याबाबत चीन सरकारने भारत सरकारला पत्र लिहून भारतीय सैनिकांनी आपल्या ८०० बकऱ्या आणि ५९ याक चोरल्याचा आरोप केला.

 एकीकडे भारतीय लष्कर पाकिस्तानसोबत लढाईत गुंतले होते. तर दुसरीकडे चीन सिक्कीममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते, अशा त्या काळात भारत सरकारने हा आरोप फेटाळला.  मात्र चीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होते. वाजपेयी तेव्हा जनसंघाचे नेते होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला. या बकऱ्यांच्या शरीरावर आम्हाला खा पण जगाला वाचवा, असे उपहासात्मक पत्रही लावले होते. दरम्यान, वाजपेयींच्या या कृतीची तेव्हा खूप चर्चा झाली. भारत सरकारनेही यावरून चीनला खरमरीत उत्तर दिले. दिल्लीमध्ये कुणीतरी ८०० बोकडांचा मोर्चा काढला. मात्र भारत सरकारचा याच्याशी संबंध नाही, कुठल्याही मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनविरोधात भारताच्या नागरिकांनी शांततापूर्ण आणि विनोदी मार्गाने दिलेली प्रतिक्रिया  आहे, असे सरकारने चीनला सांगितले.

मात्र या सर्व प्रकारामुळे चीनचा अपमान झाल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. पण त्यात चीनचेच हसे झाले. या घटनेनंतर चीनने सिक्कीममधील नथू ला येथे भारताविरोधात आगळीक केली होती. मात्र त्याला भारतीय लष्कराने सणसणीत उत्तर देऊन चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीIndiaभारतchinaचीनLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्री