भोपाळ : या निवडणुकांद्वारे कार्यकर्ते आणि नेते मिळून काँग्रेसला मध्य प्रदेशात सत्तेत आणणारच, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मंगळवारी केला. ते म्हणाले की, २५ वर्षे राज्यात भाजपाची सत्ता असून, जनता शिवराज सिंह चौहान सरकारला कंटाळली आहे.एका मुलाखतीत कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात काँग्रेस कोणाला मुख्यमंत्री करणार, याचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी हेच घेतील, असे स्पष्ट केले. आपण व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात अजिबात मतभेद वा भांडणे नाहीत, असे त्यांनी सांगितले. कमलनाथ हे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असून, ज्योतिरादित्य शिंदे व ते या दोघांकडे निवडणुकीची सारी सूत्रे सोपविण्यात आली आहेत. सभांमध्ये ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह दिसत असले तरी त्यांना प्रचारापासून दूरच ठेवण्यात आले आहे.
यंदा मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्तेत आणणारच - कमलनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 6:31 AM