शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

त्यावेळी पाकिस्तानने जिनिव्हा अॅक्टचे उल्लंघन करून भारतीय वैमानिकाची केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 8:13 PM

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे.

नवी दिल्ली - भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण देश चिंतीत आहे. मात्र जिनिव्हा कायद्याचे संरक्षण असल्याने युद्धबंदी असलेल्या भारतीय वैमानिकाच्या सुटकेची भारताला आशा आहे. पण पाकिस्तानच्या पूर्वोतिहासामुळे काही प्रमाणात चिंताही आहे. त्याचे कारण म्हणजे 1999 च्या कारगील युद्धा वेळी विमान कोसळून पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडलेल्या एका भारतीय वैमानिकाची पाकिस्तानने हत्या केली होती. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा असे त्यांचे नाव होते. 1999 साली भारत आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये कारगिलमध्ये झालेल्या युद्धावेळी भारतीय हवाई दलाने मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर राबवून पाकिस्तानी घुसखोरांचे कंबरडे मोडले होते. त्या दरम्यान स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांच्याकडे भारतीय हद्दीत लपलेल्या पाकिस्तानी सैनिकांची पोझिशन शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. मात्र या मोहिमेदरम्यान 27 मे रोजी त्यांचे विमान शत्रूच्या हल्ल्यात सापडून कोसळले. यावेळी विमानातून पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडलेले आहुजा पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. मात्र त्यांना युद्धकैद्यासारखी वर्तणूक न देता पाकिस्ताननी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. पाकिस्तानने स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना जिन्हिवा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र आहुजा यांचा मृत्यू विमानातून पडून झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण आहुजा यांची हत्या झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले होते. भारत सरकारने स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना मरणोपरांत वीर चक्र देऊन सन्मानित केले होते.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPakistanपाकिस्तान