शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:42 AM

देवदर्शन करून घरी निघालेल्या भाविकांवर काळाने रस्त्यातच झडप घातली. गुजरातमधील सांबरकांठा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. 

Accident News : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गुजरातमधील सांबरकांठा जिल्ह्यात ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कार पूर्ण चेंदामेंदा झाली, तर ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील भाविक अहमदाबादमधील आहेत. हिंदू तीर्थक्षेत्र असलेल्या शामलाजी येथे ते देव दर्शनासाठी गेले होते. येथील भगवान विष्णूचे मंदिर प्रसिद्ध आहे. 

ट्रकवर जाऊन आदळली कार

देवदेर्शन करून ते गाडीने परत अहमदाबादला निघाले होते. सांबरकांठा जिल्ह्यातील हिमतनगरजवळ त्यांची भरधाव कार ट्रेलरवर जाऊन आदळली. बुधवारी (२५ सप्टेंबर) पहाटे हा अपघात घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सात जण जागीच ठार झाले, तर एका जण गंभीर जखमी झाला. 

कटरने कापून मृतदेह काढले बाहेर

ट्रेलरवर जाऊन धडकल्याने कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरने कार कापावी लागली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढता आले. 

अपघातानंतरचा कारचा व्हिडीओ समोर आला असून, त्यावरून कारचा वेग आणि अपघाताची भीषणता किती होती, याचा अंदाज येतो. 

टॅग्स :AccidentअपघातcarकारGujaratगुजरातSocialसामाजिक