नवी दिल्ली - पुलवामा येथे जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ आहे. असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची भावना सध्या वेगळ्या पातळीवर आहे. देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार आपला पराक्रम दाखवत आहेत. आज संपूर्ण देश आज एकजुटीने आपल्या जवानांसोबत उभे आहेत. संपूर्ण जग आमची एकजूट बघत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका.''
संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ, नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 1:05 PM
भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे.
ठळक मुद्देआपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेदेशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ