Prakash Raj Tauts DCM Pawan Kalyan Over Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला असून, मंदिरातील लाडू प्रसादाची तपासणी करण्यात येणार आहे. या वादात आता दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी उडी घेतली असून, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना एक मोलाचा सल्ला देत, खोचक टोला लगावला आहे.
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
देवस्थानकडून लाडू बनविण्यासाठी ३२० रुपये किलो दराने तूप खरेदी केली जात होती. जुलै महिन्यात प्रयोगशाळेतील तपासणीत या तुपात काही बाह्य घटकांची चरबी वापरल्याचे उघडकीस आले होते. स्वस्त, भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर आता मंदिराच्या परिसराचे शुद्धीकरण करण्यात येत असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिली. याबाबत उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरून आता प्रकाश राज यांनी कान टोचले आहेत.
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री पवन कल्याण?
गेल्या सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण खूप व्यथित झालो आहोत. संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे. माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे. प्रसादाचा दर्जा नेहमीच चांगला असतो. थोडासा प्रसाद मिळाला तरी तो प्रत्येकासाठी महाप्रसादासारखा असतो. हे अत्यंत श्रद्धेने केले जाते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दिली होती.
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
प्रकाश राज यांनी सल्ला देताना लगावला खोचक टोला
पवन कल्याण यांनी एक्सवर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक सल्ला दिला आहे. तसेच खोचक टोला लगावला आहे. प्रिय मित्रा, तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लावावी. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून काढावे आणि त्यांना कठोर शिक्षा करावी. पण हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात धार्मिक तणाव कमी आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार), अशी पोस्ट प्रकाश राज यांनी केली आहे.